Shani Pradosh Vrat 2025 : हिंदू धर्मग्रंथानुसार, प्रदोष व्रताला फार महत्त्व आहे. प्रदोष व्रत (Pradosh Vrat) हे भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर आणि देवी गौरीची विधीवत पूजा करतात. यामुळे भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्यात साधारण दोनदा प्रदोष व्रत येतं. एक शुक्ल पक्षात तर दुसरं कृष्ण पक्षात. प्रदोष व्रताची पूजा त्रयोदशी तिथीच्या संध्येला म्हणजेच प्रदोष काळात केली जाते. 

Continues below advertisement

प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र, पुष्प, धूप-दीप देवाला अर्पण करुन भगवान शंकराच्या मंत्राचा जप करावा. त्यानुसार, 2025 वर्षातील शेवटचं प्रदोष व्रत नेमकं कधी असणार? तसेच, पूजा मुहूर्त काय असणार आहे या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. 

कधी आहे शनी प्रदोष व्रत?

2025 वर्षातील शेवटचं प्रदोष व्रत 17 डिसेंबर 2025 रोजी असणार आहे. हे प्रदोष व्रत बुधवारच्या दिवशी होणार आहे. यासाठीच याला बुध प्रदोष व्रत म्हणतात. जेव्हा प्रदोष व्रत बुधवारच्या दिवशी होणार आहे म्हणून त्याला बुध प्रदोष व्रत नावाने ओळखले जाते. बुधवारच्या दिवशी होणारं प्रदोष व्रत बुद्दी, वाणी तसेच, व्यवसाय क्षेत्राशी संबंधित यश प्राप्त करण्यासाठी लाभदायी ठरते. 

Continues below advertisement

शनी प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त (Shani Pradosh Vrat Shubh Muhurta 2025)

वैदिक पंचांगानुसार, त्रयोदशी तिथीची सुरुवात 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी होणार आहे. तसेच, त्रयोदशी तिथीची समाप्ती 18 डिसेंबर रोजी मध्य रात्री 2 वाजून 32 मिनिटांनी होणार आहे. प्रदोष पूजेसाठी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 41 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावं? 

  • बुध प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा करुन लावावा. तसेच, शिव चालीसाचं पठण करावं. 
  • बुध प्रदोष व्रताच्या दिवशी बुधाच्या मंत्राचा 21 वेळा जप करावा. या मंत्राचा जप करावा, ॐ बुद्धिप्रदाये नमः। 
  • त्रयोदसी तिथीच्या रात्री भगवान शंकराच्या प्रतिमेचं दर्शन घ्यावं. तसेच, पूजा करावी. 
  • प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                

Rahu Gochar 2026 : पैसा, ऐशोआराम आणि बरंच काही...नवीन वर्षात सर्वच लागणार दावणीला; राहूच्या डबल संक्रमणाने 'या' राशींवर ओढावणार संकट?