Shani Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. शनिच्या चालीत छोटासा जरी बदल झाला तरी त्याचा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने फार मोठा फरक पडतो. काल म्हणजेच 9 ऑक्टोबर 2026 रोजी शनिने पुन्हा एकदा नक्षत्र बदललं आहे. शनिचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात (Shani Nakshatra Parivartan) प्रवेश झाला आहे. याचा स्वामी स्वत: शनि आहे. त्यामुळे काही राशींसाठी (Zodiac Signs) हा काळ फार शुभकारक असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. त्यामुळे शनिचा आपल्या नक्षत्रात होणारा प्रवेश खास मानला जाणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या काही जबाबदाऱ्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत हळुहळू सुधारणा झालेली दिसेल. तुमच्या व्यवसायाशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शनिचं नक्षत्र परिवर्तन शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, नोकरीत कामाचा ताण वाढेल पण त्याचबरोबर तुम्हाला नवीन गोष्टीही शिकायला मिळतील. पैशांच्या बाबतीत घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. एकूणच तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असेल. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

Continues below advertisement

मीन रास (Pisces Horoscope)

सध्या वर्तमानात मीन राशीत शनि संक्रमण करणार आहे. त्यामुळे शनिचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होणारा प्रवेश तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. कामाच्या ठिकाणी स्थिरता जाणवेल. तसेच, तुमच्या व्यवसायात रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. हा प्रवास चांगला असेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी शनिचं हे नक्षत्र परिवर्तन आरामदायी ठरणार आहे. या काळात ऑफिसमध्ये तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. कामाच्या काही अतिरिक्त जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. मात्र, यातूनच तुम्हाला भविष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. त्यामुळे हे नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचं आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये स्थिरता पाहायला मिळेल. भविष्यासाठी तुम्ही काही नवीन योजना राबवाल. तसेच, तुमच्या उत्पन्नासाठी, भरभराटीसाठी हा काळ शुभकारक ठरणार आहे. पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Vastu Tips : रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...