Shani Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनि (Shani Dev) ग्रह सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानला जातो. त्यामुळेच शनिचा परिणाम सर्वाधिक काळापर्यंत असतो. उद्या म्हणजेच 22 फेब्रुवारी 2026 रोजी शनि उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणातून निघून दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. 

Continues below advertisement

द्रिक पंचांगानुसार, शनि महाराज या स्थितीत जवळपास 21 मार्चपर्यंत स्थित असणार आहेत. या दरम्यान शनिचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. मात्र, काही राशींना या काळात विशेष फायदा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, उत्तरा भाद्रपद नक्षत्र मीन राशीत स्थित तर, याचा स्वामी ग्रह शनि आहे. शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शनि नक्षत्र परिवर्तनाचा काळ लाभदायक असणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. करिअरमध्ये तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्यात तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल. तुमची समाजात वेगळी ओळख निर्माण होईल. 

Continues below advertisement

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी शनिच्या संक्रमणाचा बदल फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तसेच, नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदी वातावरण राहील. जुने वादविवाद मिटतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. पैशांची गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. तसेच, या काळात तुम्हाला करिअर किंवा बिझनेसमध्ये चांगला लाभ मिळू शकतो. घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच, जर तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करायचं असल्यास तुम्ही त्याची सुरुवात करु शकता. मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. प्रवासाचे योग लवकरच जुळून येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                           

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा कसा असणार? धनाचा वर्षाव की आर्थिक ओढाताण? साप्ताहिक राशीभविष्य