Shani Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाची चाल ठराविक वेळेने बदलते. ग्रह नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम मानवासह संपूर्ण जीवनावर पाहायला मिळतो. कर्मफळदाता तसेच, न्यायदेवाता शनि ग्रह (Shani Dev) येत्या 20 जानेवारी रोजी आपल्याच नक्षत्रात म्हणजे उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या राशींना नोकरीत चांगला लाभ मिळेल. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी शनिचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणात शनि देव संक्रमण करतायत. त्यामुळे तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात उत्पन्नाच्या चांगल्या संधी मिळतील. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. भावा-बहिणीतील संबंध अधिक दृढ होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी शनितचं नक्षत्र परिवर्तन सकारात्मक ठरणार आहे. या राशीच्या भाग्याच्या स्थानी शनि देव संक्रमण करतायत. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तसेच, तुमच्या जीवनात एक प्रकारे स्थिरता दिसून येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. भविष्यासाठी तुम्ही चांगल्या योजना राबवाल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी शनिदेवाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या कर्म भावात हे संक्रमण होणार आहे. या काळात तुमच्या कारभाराचा चांगला विस्तार झालेला दिसेल. तसेच, तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे घरातील इतर सदस्यांबरोबरचे संबंध देखील चांगले असतील. मित्रांचा सहवास तुम्हाला चांगला लाभेल. कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. तसेत, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा :                             

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा चांगला की वाईट? कोणत्या राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य