Shani Nakshatra Parivartan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी देव (Shani Dev) शनिवारच्या दिवशी म्हणजेच 7 जून 2025 रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. शनिदेवाचं हे नक्षत्र परिवर्तन 5 राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीदेवाला कर्मफळदाता आणि न्यायदेवता देणारा ग्रह मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळेच शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, 28 एप्रिल रोजी शनीने उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. आता या नक्षत्राच्या दुसऱ्या नक्षत्रात शनी लवकरच प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने याला फार महत्त्वाचं स्थान आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे कर्क राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गातील लोकांचं कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जाईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
7 जूननंतरचा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी फार चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येतील. तसेच, पार्टनरबरोबर तुमचा चांगला संवाद वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तसेच, तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. नशिबाची चांगली साथ मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
शनिचं हे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात करिअरच्या नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, व्यवसायात तुम्हाला नवीन योजनांचा लाभ घेता येईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, भौतिक सुख-शांती तुम्हाला मिळेल. सामंजस्याने व्यवहार करणं गरजेचं आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं हे नक्षत्र परिवर्तन फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या सुख संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तुम्हाला मानसिक ऊर्जा मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडलेले दिसतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :