Shani Nakshatra Parivartan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायाधीश ग्रह म्हणतात. असं म्हणतात शनी प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देतात. तसेच, शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत (Zodiac Signs) संक्रमण करताना त्याच राशीत शनी अडीच वर्ष स्थित राहतात. त्यामुळे शनीच्या संक्रमणाने अनेक राशी सावधान असतात. जेव्हा शनीचं राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होतं तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर होतो. 

यंदा 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसऱ्याचा शुभ दिवस आहे. तर, दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2025 रोदी शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शनी सध्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. येत्या 3 ऑक्टोबर रोजी कर्मफळदाता शनी गुरुच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच होणाऱ्या शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ कोणत्या राशींना होणार आहे ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायी ठरणार आहे. यामुळे तुमच्या करिअर आणि शिक्षणात चांगला लाभ होताना दिसेल. शनीच्या कृपादृष्टीमुळे तुमच्या व्यवसायाचा देखील विस्तार वाढलेला दिसेल. अनेक काळापासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, ज्यांचं प्रमोशन रखडलं आहे त्यांना प्रमोशनची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. या काळात पैशांची गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी शनीच्या संक्रमणाची स्थिती फार लाभदायक ठरणार आहे. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रॉपर्टीच्या संबंधातील तुमचे जुने वाद मिटतील. जर तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी लवकरच चालून येईल. तसेच, लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिचं हे नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. त्यामुळे लवकरच तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. 

शनि नक्षत्राची वेळ (Shani Nakshatra Parivartan 2025 Time)

ज्योतिष शास्त्रानुसार, 3 ऑक्टोबर 2025 रोजी शनीचं नक्षत्र परिवर्तन रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी होणार आहे. तसेच, कर्मफळदाता शनी पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मकरसह 'या' 5 राशींवर असणार शनिदेवाची कृपा, संकटातून होईल सुटका