Shani Nakshatra Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने राशींवर माजणार हाहा:कार, 17 एप्रिलपासून 4 राशींचा कठीण काळ सुरु; अलर्ट राहा
Shani Nakshatra Gochar 2026 : द्रिक पंचांगानुसार, 17 एप्रिल रोजी शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. याच दिवशी शनि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शनि 17 मेपर्यंत विराजमान असणार आहे.

Shani Nakshatra Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev) आपण कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानतो. शनिदेव आपल्या कर्मानुसार व्यक्तीला त्याच्या कर्माचे चांगले-वाईट फळ देतात. त्यामुळेच शनिदेवाला कठोर देवता मानतात. ज्योतिष शास्त्रात शनि देवाचं महत्त्व फार विशेष आहे. शनिची चाल बदलल्याने व्यक्तीची दशा, स्थिती बदलते. यामुळे आपल्या जीवनात अनेक बदल घडतात. तसेच, ज्या व्यक्तीच्या जीवनावर शनिची साडेसाती आणि ढैय्या असते त्या व्यक्तींना आयुष्यात अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, योग्य कर्म केल्यास शनिच्या साडेसातीपासून सुटकाही होते.
द्रिक पंचांगानुसार, 17 एप्रिल रोजी शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. याच दिवशी शनि उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शनि 17 मेपर्यंत विराजमान असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिचं पद नक्षत्र परिवर्तन फार लाभदायी आणि महत्त्वाचं ठरणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळेल. या दरम्यान काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे येत्या 17 एप्रिल रोजी कोणकोणत्या राशींवर शनिचं नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशींवर भारी पडणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांनी या कालावधीत थोडं सांभाळून चालण्याची गरज आहे. कारण या राशीच्या लोकांवर आधीपासूनच शनिची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला अडथळे येऊ शकतात.तुम्ही घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरु शकतात. तसेच पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये काही चढ-उतार पाहायला मिळू शकतात. तुमच्या घरातील वातावरणात तणाव वाढू शकतो. अशा वेळी शब्दांवर आणि भाषेवर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्याने समोरची व्यक्ती दुखावू शकते. तसेच, तुमचा मानसिक दबाव वाढू शकतो. या कालावधीत स्वत:ला जितकं शांत ठेवता येईल तितका प्रयत्न करा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये अनेक अडचणी वाढू शकतात. तुमचा आत्मविश्वास ढासळू शकतो. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्यात तुम्हाला उशीर होऊ शकतो. या काळात घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला धैर्य आणि सावधानतेने काम करण्याची गरज आहे. हळुहळू तुमच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी 17 एप्रिल ते 17 मे हा एक महिन्याचा 30 दिवसांचा कालावधी कठीण ठरु शकतो. या काळात तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. तसेच, तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या कालावधीत कोणताही निष्काळजीपणा करु नका. कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचं मत विचारात घ्या.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Horoscope Today 11 April 2026 : आज शनिवारच्या दिवशी 7 राशींना संकटाचा इशारा; हातातून 'ही' गोष्ट निसटण्याची शक्यता, आजचे राशीभविष्य



















