Shani Margi : वैदिक पंचांगानुसार, नवीन वर्ष 2026 लवकरच सुरु होणार आहे. या नव्या वर्षात अनेक छोट्या-मोठ्या ग्रहांचं संक्रमण (Grah Gochar) पाहायला मिळणार आहे. यामध्ये न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनिचाही (Shani Dev) समावेश आहे. नव्या वर्षात शनिची वक्री आणि मार्गी चाल होणार आहे. या व्यतिरिक्त मार्च आणि एप्रिल महिन्यात अस्त आणि उदय देखील होणार आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) पाहायला मिळणार आहे. मात्र, यापैकी 3 राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर, तुमच्या पद-प्रतिष्ठेत देखील वाढ होणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी नव्या वर्षातील शनिची चाल फार लाभदायी ठरणार आहे. या काळात शनि देव तुमच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईस. तसेच, जी तुमची आवश्यक कामे आहेत ती वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायिक क्षेत्रात प्रगती झालेली दिसेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. या कालावधीत तुम्ही घर किंवा वाहन देखील खरेदी करु शकता. भावा-बहिणीच्या नात्यात दृढता वाढेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
2026 मध्ये शनिची चाल कुंभ राशीसाठी फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या दुसऱ्या चरणात शनी संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरीत प्रमोशन देखील तुम्हाला मिळू शकतं. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या वाणीत चांगला प्रभाव दिसून येईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी शनीच्या चालीतील बदल फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या करिअर आणि व्यवसायावर याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. तसेच, नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या व्यवसायिक क्षेत्रात तुम्हाला प्रत्यक्षपणे लाभ मिळेल. तसेच, तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन देखील मिळू शकतं. एकूणच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)