Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात अनेक मोठयाग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यानुसार, कर्मफळदाता शनि (Shani Dev)महाराज नोव्हेंबर महिन्यात आपली चाल बदलणार आहेत. याचा अनेक राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम पाहायला मिळणार आहे. सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. तसेच, लवकरच शनी वक्री चालीत संक्रमण करणार आहेत. काही महिन्यांतच शनी वक्री चालीवरुन मार्गी होणार आहे.
वैदिक पंचांगानुसार, शनी देव 138 दिवस वक्री चाल चालणार आहेत. शनी नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहेत. शीची हीच बदललेली चाल काही राशींसाठी फार लकी ठरणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी शनीचं हे संक्रमण फार खास ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समल्या संपुष्टात येतील. तसेच, जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, मित्रांबरोबर मित्रांबरोबर तुमचा सहवास चांगला जाईल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुख शांती नांदेल. तसेच, नशिबाचे भाग्य उजळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची मार्गी चाल फार लाभदायी ठरणार आहे. तसेच, तुमच्या आर्थिक स्थिती चांगली स्थिरता दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या घरातील वातावरण शांततेचं असणार आहे. तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी शनीची मार्गी चाल फार भाग्यशाली ठरणार आहे. हा काळ पैशांची गुंतवणूक करण्यासाठी फार लाभदायी असणार आहे. तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच, करिअरच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना सामंजस्यानेघ्या. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर संयम ठेवणं जास्त लाभदायी ठरेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत काही चिंता करण्याची गरज नाही. जोडीदाराचा चांगला सपोर्ट मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
