Shani Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसारर, शनीला (Shani Dev) न्यायदेवता आणि कर्मफळदाता म्हणतात. कुंडलीत शनि जर शुभ स्थितीत असेल तर राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच, जर अशुभ स्थितीत असेल तर त्या राशींवर शनीची करडी नजर असते. पंचांगानुसार, कर्मफळदाता शनि 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनी मीन राशीत मार्गी होणार म्हणजेच सरळ चाल चालणार आहे. असं म्हणतात की, जेव्हा शनी वक्री चालीपासून मार्गी होतात तेव्हा जीवनातील सर्व समस्या संपतात. तसेच, आर्थिक स्थिती सुधारते.
द्रिक पंचांगानुसार, शनि 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी मीन राशीत मार्गी होणार आहे. याआधी शनी वक्री चाल सुरु होती. आता शनीच्या मार्गीमुळे कोणकोणत्या राशी मालामाल होतील ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या मार्गी चालीने मेष राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता दिसून येईल. तसेच, आतापर्यंत ज्या अडचणी येत होत्या त्या हळुहळू कमी होतील. नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तसेच, करिअर, नोकरी आणि व्यवसायात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. जीवनाच स्थिरता टिकून राहील. तसेच, भौतिक सुख समृद्धीचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल.
तूळ रास (Libra Horoscope)
शनीच्या मार्गी चालीने तूळ राशीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. तुमचं जीवन आनंददायी जाईल. तसेच, तुमच्या घरात शांती टिकून राहील. तसेच, जर तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनिच्या मार्गी चालीने तुमच्या करिअर आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर प्रसन्न होतील. या काळात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील.जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात तुमची जुन्या कर्जातून मुक्ती होईल. नवीन विचार तुम्ही अंगिकाराल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :