Shani Margi 2023 : शनिदेव हे कर्माचे दाता आहेत, जे लोकांना त्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतात. शनीची शुभ दृष्टी कोणत्याही व्यक्तीला श्रीमंत बनवते. शनीच्या कृपेने माणसाची आयुष्यात खूप प्रगती होते. ज्या व्यक्तीवर शनीची वाईट नजर पडते तो राजा पासून गरीब बनतो. कुंभ राशीमध्ये शनी आज म्हणजेच 4 नोव्हेंबरला शनी मार्गी होईल. शनीची थेट चाल काही राशीच्या लोकांना त्रासदायक ठरणार आहे. शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्ही काही उपायांचा अवलंब करू शकता.


या राशीच्या लोकांना त्रासदायक ठरणार 


वैदिक ज्योतिषानुसार शनि हा कार्य आणि सेवेचा कारक आहे, म्हणजेच त्याचा थेट संबंध तुमच्या नोकरी आणि व्यवसायाशी आहे. या कारणास्तव, शनीच्या हालचालीचा प्रभाव तुमच्या नोकरी आणि व्यवसायात यश आणि चढ-उतार दर्शवतो. ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना शनि मार्गी झाल्यानंतर नुकसान सहन करावे लागू शकते. या राशीच्या लोकांनी शनिची ग्रहस्थिती असताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शनीच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे तुमचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते. तुम्‍ही एखाद्या अपघाताला बळी पडू शकता, त्यामुळे शनिची ग्रहस्थिती असताना तुम्‍हाला खूप सावध राहावे लागेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय गरिब आणि असहाय्य व्यक्तींना त्रास देणाऱ्या, मुक्या प्राण्यांना त्रास देणाऱ्या, ज्येष्ठ आणि महिलांचा अपमान करणाऱ्यांवरही शनिदेवाचा कोप होतो. इतरांची फसवणूक करणाऱ्यांनाही शनीच्या नाराजीला सामोरे जावे लागते.



शनीचा अशुभ प्रभाव टाळण्याचे उपाय


जे लोक दर शनिवारी शनिदेवाची विधिवत पूजा करतात, त्यांना शनिदेव कोणतेही नुकसान करत नाहीत.


शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी मोहरीचे तेल आणि काळे तीळ शनिदेवाला अर्पण करावेत. यामुळे त्याचे आशीर्वाद मिळतात.


पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला जल अर्पण केल्याने शनीची वाईट नजर दूर होते.


शनिवारी काळ्या कुत्र्याला आणि कावळ्याला अन्नदान करणे शुभ मानले जाते.


शनिदेवामुळे होणाऱ्या कोणत्याही समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवार आणि शनिवारी विशेष पूजा करावी.


हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांवर आशीर्वाद देतात.


नीलम रत्न धारण केल्याने शनि ग्रहाचा अशुभ प्रभावही कमी होऊ शकतो.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Margi 2023 : आज शनि होणार मार्गी, या राशींची होणार प्रगती, लाभ मिळतील, जाणून घ्या