Shani Mangal Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि (Lord Shani) हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. असं म्हणतात, ज्या राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती असते त्या राशींना अनेक कष्ट सोसावे लागतात. शनि प्रमाणेच मंगळ (Mars) ग्रह देखील शनिप्रमाणेच क्रूर आणि साहसी ग्रह मानला जातो. शास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी शनि आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या समोरासमोर होते. त्यामुळे तीन राशींवर संकट कोसळण्याची शक्यता आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते पाहूयात.
शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने 28 जुलै 2025 रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केला होता. या संक्रमणानंतर मंगळ ग्रहाने शनिबरोबर समसप्तक योग निर्माण केला. हा योगही फार खतरनाक योग मानला जातो. सध्या शनि मीन राशीत आणि मंगळ ग्रह कन्या राशीत विराजमान आहेत. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या ठीक 180 डिग्री अंतरावर आहेत. यालाच समसप्तक योग म्हणतात.
समसप्तक योगामुळे व्यक्तीच्या नोकरी आणि करिअरवर परिणाम दिसून येतो. यामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला मोठं नुकसान देखील सहन करावं लागू शकतं. त्यामुळेच या काळात सावध राहण्याची गरज आहे.
आर्थिक नुकसान
या योगामुळे नोकरीवर तर परिणाम होतोच पण त्याचबरोबर तुम्हाला प्रचंड धनहानीचा देखील सामना करावा लागू शकतो. तुमचं आर्थिक नुकसान होईल. विनाकारण पैसे तुमच्याकडून खर्च केले जातील. तसेच, तुमचा बॅंक बॅलेन्स देखील खाली होऊ शकतो.
तीन राशींसाठी हा काळ आव्हानात्मक
शनि-मंगळ ग्रहांच्या स्थितीचा परिणाम मेष, मिथुन आणि कर्क राशीवर होणार आहे. या राशींसाठी हा काळ फार कठीण असणार आहे. या राशींना करिअरमध्ये प्रचंड नुकसान होईल. तसेच, धनहानी होईल, तुम्ही सतत मानसिक तणावात असाल. नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
मेष रास - मेष राशीच्या लोकांना या काळात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल.
मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो.
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांच्या व्यवसायावर परिणाम होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :