Shani Jayanti 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 16 मे, 2026 हा दिवस धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. शनि जयंती, शनिश्चरी अमावस्या आणि शनिवार यांसारखे अनेक शुभ योग या दिवशी एकाच वेळी तब्बल 7 योग जुळून येत आहेत, ज्यामुळे हा दिवस अधिकच विशेष बनला आहे. असे दुर्मिळ योग अत्यंत फलदायी ठरतात. विशेषतः शनिच्या साडेसाती, ढैय्या किंवा महादशेने ग्रस्त असलेल्यांसाठी, शनिचा आशीर्वाद मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, कर्म, न्याय आणि शिस्त यांचे अधिपती असलेल्या शनिदेवाचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवेल. या दिवशी काही राशींना करिअर आणि आर्थिक लाभ मिळू शकतो, तर काहींनी संयम आणि सावधगिरी ठेवणे आवश्यक राहील.. शनि जयंतीचा दिवस 12 राशींसाठी कसा जाणार? 12 राशींचे राशीभविष्य वाचा...
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी शनिदेवाच्या कृपेने रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात फायदा होईल, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील वातावरण शांत राहील. शनिमंदिरात काळे तीळ दान करणे शुभ ठरेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. पैशांची आवक वाढेल आणि जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. शनिदेवाला तेल अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल..
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे चांगले फळ मिळेल. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शनिमंत्र जप केल्याने मानसिक शांतता मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी घर आणि कुटुंबाशी संबंधित निर्णय घ्यावे लागू शकतात. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी लाभ होण्याची शक्यता आहे. भावनिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि पूजा उपयुक्त ठरेल. शनिदेवाच्या नावाने गरीबांना अन्नदान करा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होतील. शनिदेवाला काळी उडीद अर्पण करणे लाभदायक राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळा. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. शनिदेवाच्या स्तोत्राचे पठण शुभ फल देईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. शनिदेवाला काळे वस्त्र दान करणे शुभ मानले जाईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी राग आणि हट्टीपणा टाळा. नोकरीत स्पर्धा वाढू शकते. आर्थिक लाभाची शक्यता असली तरी खर्चही वाढेल. आध्यात्मिक कार्यात मन लागेल. शनिमंदिरात दीपदान करणे लाभदायक ठरेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी भाग्यवृद्धीचा दिवस राहील. प्रवासाचे योग येऊ शकतात. व्यवसायात मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शनिदेवाच्या कृपेने मानसिक ताण कमी होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी शनिदेवाची विशेष कृपा राहील. करिअरमध्ये मोठी प्रगती दिसेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. गरीबांना काळे तीळ दान करणे शुभ ठरेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. शनिदेवाच्या मंत्रजपामुळे आत्मविश्वास वाढेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी भावनिक निर्णय टाळावेत. कामात संयम ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केल्यास अडचणी कमी होतील.
हेही वाचा
