एक्स्प्लोर

Shani Jayanti 2025: आतापर्यंत सोसलं, शनि जयंतीला बनतायत दुर्मिळ योग! 'या' राशींचे शनिदेवांकडून लाड होणार, राजासारखं जीवन जगणार

Shani Jayanti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जयंतीच्या दिवशी विविध राजयोग तयार होत आहेत, ज्याचा परिणाम 12 राशींच्या जीवनात दिसून येणार आहेत. जाणून घेऊया भाग्यवान राशींबद्दल

Shani Jayanti 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायाधीश आणि कर्माची देवता म्हटले जाते. तसं पाहायला गेलं तर शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. पण ज्येष्ठ अमावस्येचा दिवस शनिदेवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. याचे कारण म्हणजे शनिदेवांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणून हा दिवस शनि जयंती म्हणून साजरा केला जातो. वैदिक पंचांगानुसार, अवघ्या काही दिवसात शनि जयंती येतेय. शनि जयंतीच्या दिवशी, सर्वार्थ सिद्धी योगासह त्रिपुष्कर, मालव्य यांसारखे राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे त्याचे परिणाम 12 राशींच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येणार आहेत. जाणून घेऊया भाग्यवान राशींबद्दल

2025 मध्ये शनि जयंती कधी आहे?

हिंदू दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या 26 मे रोजी दुपारी 12:11 वाजता सुरू होईल आणि 27 मे रोजी सकाळी 8:31 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, शनि जयंती 27 मे रोजी साजरी केली जाईल. 

2025 च्या शनि जयंतीला दुर्मिळ योगायोग घडतोय...

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जयंतीच्या दिवशी शनि मीन राशीत असेल. यासोबतच, वृषभ राशीत बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल. तसेच शुक्र त्याची उच्च राशी मीनमध्ये असल्याने, मालव्य राजयोग तयार होईल. याशिवाय सर्वार्थ सिद्धी योगासह त्रिपुष्कर राजयोग देखील तयार होत आहे. हा दिवस मंगळवार देखील आहे. म्हणूनच हा दिवस सर्वात दुर्मिळ आणि शक्तिशाली दिवस मानला जात आहे.

शनि जयंती 2025 चा 12 राशींवर प्रभाव

मेष

शनि जयंतीचा दिवस तसा सर्व राशींसाठी खास असेल, मात्र मेष राशीच्या लोकांवर शनिदेव आपले विशेष आशीर्वाद देऊ शकतात. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो. यासोबतच समाजात आदर वाढू शकतो.

वृषभ

वृषभ या राशीच्या नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शनि आहे. भाग्य आणि कर्माचे स्वामी असल्याने, शनिदेव या राशीच्या लोकांवर आपले विशेष आशीर्वाद देऊ शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. यामुळे, तुमच्या कष्टाचे चीज होऊ शकते.

मिथुन

मिथुन राशीमध्ये, शनिदेव आठव्या आणि नवव्या घराचे स्वामी असतील आणि कर्माच्या घरात राहतील. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो. पण आरोग्याबाबत थोडी काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ताण येऊ शकतो.

कर्क

कर्क राशीच्या कुंडलीच्या सातव्या आणि आठव्या घराचा स्वामी शनि आहे आणि तो भाग्यस्थानात स्थित आहे. यासोबतच या राशीच्या लोकांना कंटक शनीच्या त्रासातून आराम मिळाला आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही मिळू शकतो. शनीची पूजा करून प्रत्येक दुःख आणि वेदना दूर करता येतात.

सिंह

सहाव्या आणि सातव्या घराचे स्वामी शनि महाराज आठव्या घरात विराजमान आहेत. अशा परिस्थितीत, या राशींना शनि जयंतीच्या दिवशी थोडे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण या राशीसाठी काटेरी शनीचा त्रास सुरू होऊ शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

कन्या

पाचव्या आणि सहाव्या घराचे स्वामी शनि महाराज सातव्या घरात विराजमान आहेत. अशा परिस्थितीत, काही राशीच्या लोकांनी शनि जयंतीला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम मुलांवर, आरोग्यावर आणि शिक्षणावर दिसून येईल. अशुभ परिस्थिती टाळण्यासाठी शनीची पूजा करा.

तूळ

या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल, ज्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. मुलांच्या आनंदासोबतच भौतिक सुखही मिळू शकते.

वृश्चिक

तिसऱ्या आणि चौथ्या घराचे स्वामी शनि महाराज पाचव्या घरात विराजमान असतील. अशा परिस्थितीत, शनि जयंतीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतो. तुमच्या भावा-बहिणींसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. शनिपूजन केल्याने जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. यासोबतच संबंध सुधारतील.

धनु

शनिदेव हे धन आणि धैर्याचे स्वामी आहेत. अशा परिस्थितीत, शनि जयंतीला, या राशीच्या लोकांना शनिदेवाचे विशेष आशीर्वाद असतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्यासोबतच तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मकर

शनि हा तुमचा स्वामी ग्रह आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच येऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. शनीची पूजा केल्याने खूप फायदे मिळू शकतात.

कुंभ

या राशीचा स्वामी असल्याने, शनि दुसऱ्या घरात स्थित आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. अनावश्यक खर्चापासून मुक्ती मिळू शकेल. परराष्ट्र व्यवहारात यश मिळू शकते.

मीन

या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात मिश्र परिणाम दिसतील. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. पण आर्थिक परिस्थिती थोडी अस्थिर असणार आहे.

हेही वाचा :

Weekly Horoscope: 'मे' चा शेवट, 'जून' ची सुरूवात भाग्यशाली! नव्या आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Jayanti 2026: साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
Shubh Yog: 5 राशींचं नशीब फळफळलं! आज बुधादित्य राजयोगासह जुळले शुभ संयोग, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात बंपर लाभ...
5 राशींचं नशीब फळफळलं! आज बुधादित्य राजयोगासह जुळले शुभ संयोग, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात बंपर लाभ...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Devendra Fadnavis and PM Modi: मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
Embed widget