Shani Jayanti 2024 : यावर्षी शनी जयंती (Shani Jayanti) 6 जून रोजी साजरी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अमावस्येला शनीचा (Shani Dev) जन्म झाला त्यामुळे या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. या दिवशी कर्मफळदाता शनीची (Lord Shani) 5 राशींवर विशेष कृपा असणार आहे. शनी जेव्हा राशींवर (Zodiac Signs) खुश असतो तेव्हा तो व्यक्तीच्या जीवनात अनेक सुख-सोयी घेऊन येतो. त्यामुळे यंदा कोणत्या राशींसाठी शनी जयंती लाभदायक ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
यावर्षी शनी जयंती ही मेष, वृषभ, मिथुन तसेच, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या दिवशी या राशींच्या जीवनात आपल्याला अनेक बदल घडताना दिसतील. नोकर, व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे. नेमके या राशींच्या जीवनात कोणते बदल घडतील ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, नोकरीनिमित्त तुम्हाला बदली देखील मिळू शकते. तुमची दिवसेंदिवस प्रगती होत जाईल. तसेच, या काळात तुम्ही पैशांचा वापर जपून करणं गरजेचं आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनी जयंतीच्या दिवशी वृषभ राशीचे लोक जे काही कार्य हाती घेतील त्यात तुम्हाला भरघोस यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी तर हा काळ फार चांगला असणार आहे. व्यवसायात फार प्रगती दिसून येईल. पैशांची आवक वाढेल. तुम्हाला करिअरमदध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, व्यवसायात तुम्हाला चांगली डील किंवा ऑफर मिळू शकते. एकूणच तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
शनी जयंतीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगलीच वाढ होईल. अचानक धनलाभ झाल्याने तुम्हाला फार आनंद होईल. तुमची एखादी हरवलेली वस्तू तुम्हाला परत मिळू शकते. तसेच, तुमच्या कौटुंबिक जीवनात शांती दिसून येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ दिसून येईल. तुमच्या आयुष्यात असणारी पैशांची कमतरता दूर होईल. तसेच, शनीच्या कृपेने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: