Shani Jayanti 2023:  दक्षिण भारतात शनी जयंती (Shani Jayanti 2023)  20 एप्रिल 2023 वैशाख अमावस्येला साजरी केली जाईल. त्याचवेळी 19 मे 2023 रोजी उत्तर भारतात जेष्ठ अमावास्य साजरी केली जाईल. आता शनी जयंतीचा मुहूर्त, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घेऊयात 


शनी जयंती वर्षातून  वैशाख आणि ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाईल. दक्षिण भारतात 20 एप्रिल 2023 रोजी वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाईल. दुसरीकडे, 19 मे 2023 रोजी उत्तर भारतात शनीची जयंती ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाईल. या दिवशी वट सावित्री व्रत देखील केलं जाईल.  शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सूर्य आणि छाया यांचा पुत्र शनी. शनिदेव  ही कर्मदेवता आहे. शनी धन, सुख, संतती, सौभाग्य, यश, कष्ट करणार्‍यांना आणि सत्कर्म करणार्‍यांना फळ  देतो. शनिदोष, शनीची साडेसाती यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीचा दिवस अतिशय शुभ आहे. जाणून घेऊया शनी जयंतीचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि उपाय





वैशाख अमावस्येचा  शनि जयंती 2023  (Vaishakh Shani Jayanti 2023 )


वैशाख अमावस्या तिथी प्रारंभ - 19 एप्रिल 2023, सकाळी 11.23 


वैशाख अमावस्या समाप्ती  - 20 अप्रैल 2023, सकाळी 09.41 


शनी जयंती 2023 ज्येष्ठ अमावस्या (Jyestha shani jayanti 2023 )


ज्येष्ठ महिना अमावस्या प्रारंभ - 18 मे 2023, सकाळी 09:42


ज्येष्ठ महिना अमावस्या समाप्ती - 19 मे 2023, रात्री 09:22 


सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 05.51 - रात्री 11.11  


सकाळची वेळ - सकाळी  05.51 - सकाळी  07.28 (19 मे 2023)


दुपारचा मुहूर्त -  सकाळी 10.43 - रात्री  01.58 (19 मे 2023)


संध्याकाळची वेळ -संध्याकाळी  06.50  - संध्याकाळी 08.12  (19 मे 2023)


शनी जयंती पूजा विधि (Shani jayanti puja vidhi) 


शनि जयंतीला शनि मूर्तीवर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा. ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा . शनिदेवाला निळी फुले, निळे वस्त्र अर्पण करा. काळ्या तिळापासून बनवलेले पदार्थ देवाला अर्पण करा. गरजूंना बूट, चप्पल, तीळ आणि मोहरीचे तेल दान करा. पूजेनंतर, जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांसाठी देवाकडे क्षमा मागावी. शेवटी प्रसाद वाटून स्वतः घ्यावा. यामुळे शनि प्रसन्न होतो आणि शनिदोष कमी होतो असे मानले जाते. 




शनि जयंतीची पूज करतानाचे नियम (Shani Jayanti Niyam) 


महिलांनी शनिदेवाची पूजा करताना मूर्तीला हात लावू नये. तसेच शनिदेवाची पूजा करताना त्याच्या डोळ्यात पाहू नका . 


शनि जयंतीच्या दिवशी उडीद डाळ खाऊ नका. याशिवाय उडदापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, असे केल्याने शनिदेव क्रोधित होतात.


शनि जयंतीच्या दिवशी मांस, मद्य या वस्तूंचे सेवन करू नका, असे मानले जाते की असे करणाऱ्याला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. या दिवशी मोहरीचे तेलही खरेदी करू नका.


शनि जयंतीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे नियम पाळा. दुसरीकडे, अमावस्या असल्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)