Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे शनीच्या (Lord Shani) साडेसातीचं नाव ऐकताच सर्वांना भीती वाटते. मात्र, शनीची साडेसाती म्हणजे नेमकं काय? साडेसातीचा काळ किती वर्षांचा असतो? आणि उद्यापासून म्हणजेच 29 मार्चपासून कोणत्या राशींवर शनीची साडेसाती सुरु होणार आहे? त्याचा राशींवर (Zodiac Signs) कसा परिणाम होणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

शनी हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. 2025 वर्षात 29 मार्च रोजी म्हणजेच उद्या शनीचं राशी संक्रमण होणार आहे. या दिवशी शनी अमावस्या तसेच सूर्यग्रहणाचा देखील योग आहे. शनीच्या राशी संक्रमणाबरोबरच शनीचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. या राशीत तब्बल अडीच वर्ष शनी महाराज स्थित असणार आहेत. 

शनीची साडेसाती म्हणजे काय? 

प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. शनीच्या साडेसातीचा काळ सात वर्षांचा असतो. तसेच, शनीने एका राशीत प्रवेश करताच हा काळ अडीच वर्षांचा असतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, शनी जेव्हा जेव्हा राशी संक्रमण करतात तेव्हा त्या राशीवर आणि त्याच्या पुढच्या मागच्या राशीवर साडेसातीचा प्रभाव पडतो. शनीच्या साडेसातीचे तीन चरण असतात. 

'या' राशींवर असणार साडेसाती

नुकतंच होणाऱ्या शनीच्या राशी संक्रमणामुळे मेष राशीवर साडेसातीचा पहिला चरण सुरु होईल. तर, कुंभ राशीवर साडेसातीचा दुसरा चरण असेल आणि मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा तिसरा चरण असणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

उद्यापासून होणाऱ्या शनीच्या राशी संक्रमणाने मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. हा काळ मेष राशीसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेू नका. किंवा तुमचं काम न झाल्यामुळे कोणाचा त्रागा करु नका. कारण अडीच वर्षांचा का साडेसातीचा काळ असणार आहे. त्यामुळे कोणतेही शॉर्टकट्स वापरु नका. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा असणार आहे. त्यामुळे राशीने देखील ताक फुंकून प्यावं. तसेच, तुम्ही या अडीच वर्षांच्या काळात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु नका. तुम्हा आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, शुभ कार्यात देखील अडथळा येण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा असणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना देखील थोड्याफार प्रमाणात साडेसातीची झळ भासणार आहे. हा काळ तुमच्यासाठी संकटाचा आहे. त्यामुळे नवीन नोकरी, शुभ कार्य आणि गुंतवणूक यांसारख्या कोणत्याच गोष्टी या काळात करु नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:   

April Monthly Horoscope 2025 : खर्च वाढणार, कर्जाचा डोंगर उभा राहणार; एप्रिल महिन्यात 'या' 4 राशींच्या खिशाला लागणार कात्री, मासिक राशीभविष्य