Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यानुसार, यंदा 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा (Diwali 2025) सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीच्या आधीच शनी (Lord Shani) महाराज आपल्या चालीत परिवर्तन करणार आहे. यामुळे अनेक राशींच्या आयुष्यात नवीन बदल घडतील.
शास्त्रानुसार, सध्या शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात संक्रमण करणार आहे. शनी महाराजांचं दिवाळीच्या आधी होणारं हे नक्षत्र परिवर्तन फार महत्त्वाचं ठरणार आहे. शनी महाराज 3 ऑक्टोबर 2025 रोजी शुक्रवारी रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी संक्रमण करतील. तर, पूर्व भाद्रपद नक्षत्रात 20 जानेवारी 2026 पर्यंत विराजमान असतील. शनीच्या या परिवर्तनाचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी शनीचं संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी धनप्राप्तीचे अनेक योज जुळून येणार आहेत. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. शनि महाराजांच्या कृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसणार आहे. नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही सक्षम असाल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्ही गुंतवणूक केलेल्या कार्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या प्रगतीचे अनेक मार्ग उघडताना दिसतील. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येणार आहे. तुमच्या स्वप्नांचा तुम्ही पाठपुरावा घ्याल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश फार शुभकारक ठरणार आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, या काळात मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येऊ शकतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :