Shani Vakri Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) फार महत्त्व आहे. शनीच्या अशुभ स्थितीला प्रत्येकजण घाबरतो, परंतु हेच जर शनि शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचा चांगला काळ सुरू होतो.
शनि सध्या कुंभ राशीत विराजमान असून तो सरळ चालीत भ्रमण करत आहे, परंतु लवकरच शनि वक्री होईल. वक्री म्हणजे उलटी चाल. शनीचं उलट गतीने होणारं संक्रमण काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतं. पंचांगानुसार, 29 जूनला मध्यरात्री 12 नंतर शनि उलट गतीने भ्रमण सुरू करेल. यानंतर 15 नोव्हेंबरला शनि वक्री स्थितीतून बाहेर येऊन थेट सरळ गतीने भ्रमण करेल.
30 जून ते नोव्हेंबरपर्यंत शनि उलट गतीत भ्रमण करेल. 135 दिवस होत असलेल्या शनीच्या उलट चालीमुळे (Shani Vakri 2024) काही राशींचं भाग्य उजळू शकतं, या राशींना धन-ऐश्वर्य लाभेल. नेमक्या कोणत्या राशींचं नशीब येत्या 5 महिन्यांत पालटणार? जाणून घेऊया.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीचा मोठा फायदा होऊ शकतो. या राशीच्या सहाव्या घरात शानि प्रतिगामी होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचीही शक्यता आहे. त्याच वेळी तुमच्याकडे अशा ठिकाणाहून पैसे येतील, जिथून तुम्ही विचारही केला नसेल. प्रेम जीवनात रोमान्स कायम राहील. करिअरची स्थितीही चांगली राहील.
मेष रास (Aries)
शानीची उलटी चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानली जाते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. त्याचसोबत तुमच्या कुटुंबात शांततेचं आणि आनंदाचं वातावरण राहील. या काळात तुमची आर्थिक परिस्थितीही स्थिर राहणार आहे.
वृषभ रास (Taurus)
शनीची उलटी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. या राशीच्या कर्म घरामध्ये शनि प्रतिगामी असेल. या 5 महिन्यांत तुमच्या जीवनातील समस्या कमी होऊ लागतील. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचं आरोग्य चांगलं राहील. त्याचबरोबर आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुमच्याकडे अनपेक्षितरित्या पैसा येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :