Shani Dhaiyya 2026: हिंदू धर्मात, शनिदेवाला न्यायाची देवता आणि कर्माचे फळ देणारा मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रहांला नऊ ग्रहांपैकी सर्वात महत्त्वाचा ग्रह मानले जाते. जीवनात काही अडचण आली तर अनेक लोक बऱ्याचदा शनि साडेसाती मागे लागली असं म्हणतात. पण 'शनिची ढैय्या' याबाबत फार कमी लोकांना माहित असते. शनिदेवांची साडेसाती आणि ढैय्या प्रत्येक राशीच्या लोकांवर आलटून पालटून परिणाम करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या 2 राशी या ढैय्याच्या प्रभावाखाली आहेत. जी तुमच्या नोकरीपासून, पैसा, वैवाहिक जीवनावर परिणाम करते. जाणून घेऊया...
शनिची ढैय्या म्हणजे काय? जी भल्याभल्यांना कंगाल करते...(Shani Dhaiyya 2026)
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाची साडेसाती आणि ढैय्या प्रत्येक राशीच्या लोकांवर आलटून पालटून परिणाम करतात. लोकांना साधारणपणे शनिदेवाच्या साडेसातीबद्दल सर्व काही माहित असते, पण ढैय्याबद्दल कमी माहिती असते. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि कुंडलीतील आठव्या घरात असतात, तेव्हा त्या व्यक्तीवर ढैय्याचा प्रभाव पडू लागतो. शनि ढैय्या अडीच वर्षे टिकते आणि प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर क्रमाने परिणाम करते. शनिदेवाच्या ढैय्यादरम्यान, व्यक्तीला मानसिक ताण, आरोग्याशी संबंधित समस्या आणि आर्थिक अडचणींचा अनुभव येतो.
साडेसातीपेक्षा ढैय्या दुःखदायक? शनि ढैय्या काळात नेमकं काय घडतं?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ढैय्या म्हणजे शनिदेवाचा तुमच्या जीवनावरील नकारात्मक प्रभाव. साडेसातीपेक्षा ढैया कमी दुःखदायक मानली जाते. शनि ढैया काळात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडते, कामाचा वेग मंदावतो आणि कष्टाचे फळही मिळत नाही. शनिची ढैय्या नेहमीच दुःखदायक नसते. जे लोक आयुष्यात चांगली कर्मे करतात त्यांना त्याचे फळ मिळते. जे लोक वाईट कर्मे करतात त्यांना ढैयामुळे दुःख भोगावे लागते.
2026 मध्ये 'या' राशींवर ढैय्या..
2026 मध्ये, शनिचे मीन राशीतील संक्रमण धनु आणि सिंह राशींवर परिणाम करेल. परिणामी, 2026 मध्ये तुम्हाला नोकरीपासून ते आरोग्याच्या समस्यांपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात, तुमचे काही पैसे अडकून पडू शकतात. तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवनातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ढैय्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी..
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ढैय्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपल्या कर्मांमध्ये सुधारणा केली पाहिजे. गरिबांना त्रास देऊ नये आणि त्यांना मदत करावी. भगवान हनुमानाची पूजा करावी. विशेषतः प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसेचे पठण करावे. दररोज सकाळी, "ॐ त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम्, उर्वारुक मिव बंधनन मृत्योर्मुक्षीय मा मृतात्" या मंत्राचा 11 वेळा जप करावा. शनिवारी शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा नैवेद्य दाखवावा.
ही वाचा
