Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीवर कर्मफळदाता शनीची (Shani Dev) कृपा असते त्या व्यक्तीवर कोणत्याच प्रकारचं संकट येत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्या राशीच्या लोकांवर शनीची (Lord Shani) कृपा असते त्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतात. ग्रहांचा न्यायाधीश शनी 3 ऑक्टोबर रोजी राहू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे, नवरात्रीच्या आदल्या दिवशी शनी ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा कोणकोणत्या राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, 3 ऑक्टोबर रोजी 12 वाजून 10 मिनिटांनी राहूच्या शतभिषा नक्षत्रात शनी प्रवेश करणार आहे. याचा काही राशींवर शुभ तर काही राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम पडू शकतो.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणं फार लाभदायी ठरणार आहे. अनेक दिवसांपासून तुमच्यासमोर जी संकटं येत होती ती लवकरच दूर जातील. कामातून मिळणारा तणाव दूर होईल. तसेच, पैशांच्या संबंधित तुम्हाला कोणत्याच अडचणी जाणवणार नाहीत.
सिंह रास (Leo Horoscope)
शनीचं नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहयोग तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर नवीन कार्य सुरु करायचं असेल तर त्यासाठी 3 ऑक्टोबरचा दिवस फार चांगला ठरणार आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन चांगलं ठरणार आहे. या काळात तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडतील. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तसेच, मित्रांच्या साहाय्याने तुमची अनेक कामे सोपी होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
शतभिषा नक्षत्रात शनीचं राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी फार उत्तम ठरणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक तसेच कौटुंबिक जीवनात अगदी सुखाचे दिवस असतील. तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीचं शतभिषा नक्षत्रात असणं फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडताना दिसतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा पाहायला मिळेल. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: