Shani Dev : शनीच्या चालीबरोबर शनीची (Shani Dev) साडेसातीसुद्धा बदलते. त्यामुळे येत्या 10 वर्षांत पाहिलं तर काही राशींच्या लोकांच्या साडेसातीचा काळ संपणार आहे. तर, काही राशीच्या लोकांची साडेसाती सुरु होणार आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनी (Lord Shani) हा दंडकारक आहे. शनी प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार त्यांना चांगले वाईट परिणाम देतो. शनीची महादशा, साडेसाती, ढैय्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो.
माहितीसाठी, कुंभ ज्या राशीत स्थित आहे त्या राशीच्या आधीच्या एका राशीपासून शनीची साडेसाती सुरु होते. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर साडेसाती सुरु आहे. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशींवर साडेसातीचा काळ सुरु राहील.
कोणत्या राशींवर कधी असणार साडेसाती?
पुढच्या 10 वर्षांसाठी शनीच्या साडेसातीचं हे समीकरण पुन्हा बदलणार आहे. 2034 मध्ये सिंह राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती 13 जुलै 2034 पासून सुरु होणार आहे. 29 जानेवारी 2041 पर्यंत साडेसातीचा हा कार्यकाळ सुरु राहणार आहे. कन्या रास आणि शनीच्या साडेसातीची सुरुवात 27 ऑगस्ट 2036 पासून सुरु होणार आहे तर 12 डिसेंबर 2043 रोजी ही साडेसाती संपणार आहे. तर, तूळ राशीच्या लोकांची साडेसाती 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर, या साडेसातीचा काळ 8 डिसेंबर 2046 पर्यंत असणार आहे.
ज्या राशींवर शनीच्या साडेसातीचा किंवा ढैय्याचा प्रभाव आहे अशा राशीच्या लोकांनी या काळात इतरांशी व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे. तसेच,इतरांचा आदर केला पाहिजे. कोणाचा अपमान करू नये. तसेच, शक्य असल्यास सर्वांची मदत करावी.
किती चरण असतात?
शनी जेव्हा दुसऱ्या राशीच्या किंवा 12 व्या राशीत असतात तेव्हा त्या राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु असते. साडेसातीचा प्रभाव तीन चरणांचा असतो. जो अडीच-अडीच वर्षांचा असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: