Shani Dev : कर्मफळदाता शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. कारण शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनीला (Shani Dev) सर्वाकत संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 वर्षांचा कालावधी लागतो.


शनी सध्या आपली मूळ रास म्हणजचे कुंभ राशीत विराजमान आहे. मार्च 2025 पर्यंत शनी कुंभ राशीत विराजमान असणार आहे. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीत शनी नवव्या आणि दहाव्या चरणाचे स्वामी आहेत तसेच मीन राशीत प्रवेश करुन शनी एकादश चरणात स्थित राहणार आहेत. त्यामुळे शनीचं संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, ऑफिसमध्ये तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगलाच सहभाग मिळेल. तुमच्या करिअरमध्ये देखील तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या अष्टम आणि नवव्या चरणाचा स्वामी शनी आहे. तसेच, मीन राशीत शनीने प्रवेश केल्याने तो दशम चरणात असणार आहे.या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रहाचा संबंध थेट शनी ग्रहाशी आहे. त्यामुळे हा काळ मिथुन राशीच्या लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. त्याचबरोबर तुमचं आरोग्यही चांगलं राहील. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या द्वादश चरणाचा स्वामी ग्रह शनी आहे. तसेच, मीन राशीत प्रवेश केल्याने दुसऱ्या चरणात शनी राहणार आहे, त्यामुळे या राशीतच्या लोकांना शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागणार नाही. तसेच, तुम्ही शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांपासून दूर राहाल. या काळात कुटुंबीयांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. व्यापारात तुमची चांगली वाढ होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 24 August 2024 : आज शनिवारचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य