Shani Dev : ज्योतिष शास्त्रात, शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनीचे (Shani Dev) एका राशीत बऱ्याच वेळापर्यंत स्थायी रुपात असल्या कारणाने त्याचा काही राशींवर फार प्रभाव होतो. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. 2025 मध्ये शनी बृहस्पती मीन राशीत संक्रमण करणार आहे. शनी 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, शनी या राशीत 3 जून 2027 पर्यंत असणार आहेत.
शनीचं मीन राशीत परिवर्तन अडीच वर्षांपर्यंत असणार आहे. याचा काही राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
2025 मध्ये शनीच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या कालावधीत तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. शनीच्या कृपेमुळे तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुम्हाला चांगली धनप्राप्ती होईल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचं मीन राशीत संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. शनीच्या कृपेने तुम्हाला चांगलाच धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नोकरीत तुमची प्रगती दिसून येईल. तुमची एकूणच आर्थिक स्थिती चांगली राहील. ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
शनीच्या राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला परिणाम मिळणार आहे. शनीच्या परिवर्तनाने तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. तसेच, या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. आरोग्य देखील ठणठणीत राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology Panchang 23 August 2024 : आज शुक्रादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंह राशीसह 'या' 5 राशींवर बरसणार देवी लक्ष्मीची कृपा