Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) हा कुंभ आणि मकर राशींचा स्वामी आहे. शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गक्रमण करणार आहेत. याचाच अर्थ वक्री चालीनंतर शनी आता सरळ चाल चालणार आहेत. त्याचबरोबर शश राजयोगदेखील निर्माण होणार आहे. यामुळे तीन राशींच्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या तीन राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा दुर्लभ राजयोग लाभदायक होण्याची शक्यता आहे. कारण शनीच्या मार्गक्रमणामुळे या राशीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. नोकरदार वर्गातील लोकांना देखील कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण लाभेल. वरिष्ठ अधिकारी तसेच, सहकाऱ्यांबरोबर तुमचा चांगला ताळमेळ राहील.
मकर रास (Capricorn Horoscope)
दुर्लभ राजयोगाचा परिणाम मकर राशीच्या लोकांवर देखील होणार आहे. या काळात तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळतील. या राशीच्या धन आणि वाणीवर शनीचा प्रभाव पडणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यक्तिमत्वात चांगला बदल दिसून येईल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज पूर्ण होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा दुर्लभ राजयोग फार अनुकूल सिद्ध होणार आहे. कारण हा राजभाव तुमच्या कर्म भावावर जुळून येणार आहे. त्यामुळे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळेल. तुमच्या कामकाजात तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच , व्यापारी वर्गातील लोकांना बिझनेसमध्ये चांगली कमाई होईल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक नवीन जबाबदाऱ्या पडू शकतात. तुमचं आरोग्य उत्तम राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: