Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Lord Shani) हा सर्व 9 ग्रहांमध्ये सहावा ग्रह आहे. बृहस्पतिनंतर शनी (Shani Dev) हा सर्वात मोठा ग्रह मानला गेला आहे. शनीला न्यायदेवता म्हणतात. शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनीच्या चालीने अनेक राशींवर साडेसाती सुरु होते. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो.


शनीच्या राशी परिवर्तनाने काही राशींच्या लोकांवर साडेसाती सुरु होते. तर काही राशींची साडेसाती संपते. काही राशीच्या लोकांवर ढैय्याचा प्रभाव राहतो. तर, काही राशीच्या लोकांवर शुभ दृष्टी राहते. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. पुढच्या 10 वर्षांत शनीचा वाईट परिणाम कोणत्या राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर होणार आहे हे जाणून घेऊयात. 


शनीचा प्रभाव कोणत्या राशींवर कसा पडणार आहे?


शनीने मागच्या वर्षी 2023 मध्ये कुंभ राशीत संक्रमण केलं होतं. शनीने कुंभ राशीत संक्रमण केल्याने मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर साडेसाती सुरु आहे. तर, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर ढैय्या सुरु आहे. 


2025 पर्यंत शनीचा प्रभाव कोणत्या राशीवर कसा असणार आहे?


2025 मध्ये 29 मार्च रोजी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीने संक्रमण करताच मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसातीचा पहिला चरण सुरु आहे. मीन राशीच्या लोकांवप दुसरा तर कुंभ राशीच्या लोकांवर शेवटचा चरण सुरु आहे. या दरम्यान मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे. 


2026 मध्ये शनीचं संक्रमण 


2026 मध्ये शनी राशी परिवर्तन करणार नाही.


2027 मध्ये शनीचं राशी परिवर्तन 


शनी 3 जून 2027 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर, 2028 मध्ये शनी कोणत्याच राशीत परिवर्तन करणार नाही. 


2029 मध्ये शनीचं राशी परिवर्तन 


शनीचं संक्रमण 8 ऑगस्ट 2029 रोजी होणार आहे. या दिवशी शनी शुक्र राशीत प्रवेश करणार आहे. दृक पंचांगानुसार, शनी वक्री होऊन मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 2030 मध्ये शनी वृषभ राशीत असणार आहे. तर, 2031 मध्ये शनीचं संक्रमण अन्य राशीत होणार आहे. 


2034 मध्ये शनीचं राशी परिवर्तन 


शनी कर्क राशीत 13 जुलै 2034 रोजी प्रवेश करणार आहे. 


शनीच्या साडेसाती दरम्यान काय करावं? 


शनीच्या साडेसाती दरम्यान शनीला खुश करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या किंवा शमीच्या झाडाची पूजा करावी. या झाडांना संध्याकाळी पाणी घालावं. तसेच, रोज हनुमान चालीसा, शनी चालीसा आणि शिव चालीसाचा पाठ करावा. तसेच, रोज भगवान शंकराची आणि हनुमानाची पूजा करावी. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 25 August 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य