Shani Dev : नवीन वर्ष 2023 हे शनिदेवाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे वर्ष आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये शनि आपली राशी बदलणार आहे. यानंतर काही राशींवर शनीचा त्रासदायक काळ सुरू होईल. शनिदेवाची वक्र दृष्टी होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. नाहीतर संकटांमध्ये अशा प्रकारे अडकून पडाल की त्यावर मात करणे कठीण होईल. ज्योतिषास्त्रानुसार, सध्या शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. परंतु 17 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल.  


2024 मध्ये शनि राशी बदल करणार नाही 
विशेष म्हणजे 2023 मध्ये कुंभ राशीत आल्यानंतर 2024 मध्ये शनी कोणताही राशी बदल करणार नाही. 


2025 मध्ये शनि संक्रमण होणार 
पंचांगानुसार, 2023 नंतर, 2025 मध्ये शनीची राशी बदलेल. म्हणजेच शनी बराच काळ कुंभ राशीत राहणार आहे. वर्ष 2025 मध्ये 29 मार्च रोजी सकाळी 11.01 वाजता शनी आपली राशी बदलेल आणि मीन राशीत भ्रमण सुरू करेल.


या राशींना काळजी घ्यावी लागेल  


मकर : मकर राशीवरही शनीची साडेसाती चालू आहे. पण मकर राशीला शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल. या दरम्यान शनी काही चांगले परिणाम देऊ शकतात. आर्थिक बाबतीत यश मिळू शकते. मात्र आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. इतरांवर टीका करणे टाळा. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आतापर्यंत अडथळे येत होते, ते दूर होऊ शकतात.


कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या संक्रमणादरम्यान विशेष काळजी घ्यावी लागेल. कुंभ राशीत साडेसाती होत आहे. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेवाच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसरा टप्पा वेदनादायक मानला जातो. म्हणूनच कोणतेही चुकीचे काम करू नका. नियम पाळा. यासह राग आणि अहंकारापासून दूर राहा.


सूर्यग्रहण 2023  
या वर्षी 2023 मध्ये होणार्‍या 4 ग्रहणांपैकी दोन ग्रहणे कंकणकृती सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी आणि खंडग्रास चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी फक्त शनिवारीच पडत आहेत. त्यामुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम होईल. 
शनीने अडचणी निर्माण करू नये यासाठी या गोष्टींची विशेष काळजी घ्या 


खोटे बोलू नका


कोणाचीही फसवणूक करू नका.


इतरांचे नुकसान करण्यासाठी पैशाचा वापर करू नका.


तुमच्या पदाचा गैरवापर करू नका.


निसर्गाची हानी करू नका.


गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करा.


गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत.


गरीब आणि कष्टकरी लोकांचा आदर करा.


नियम आणि शिस्त पाळा.


महिलांचा आदर करा.


कर्ज देणे आणि घेणे टाळा.


मर्यादित संसाधनांसह अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा.


शनि मंत्रांचा जप करा.


शनिवारी शनि मंदिरात शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा.


शनि चालिसाचे पठण करा.