Shani Dev : शनिवारी न्यायाची देवता शनिदेवाची पूजा केली जाते. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. असे मानले जाते की ज्या लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात त्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. मात्र तुमच्या पत्रिकेत शनीची स्थिती खराब असेल तर व्यक्तीचे कोणतेही काम सहजासहजी होणार नाही. प्रत्येक कामात त्याला अडथळ्यांचा सामना करावा लागेल. शनीची ढैय्या सुरू असल्याने अनेकांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागेल.
या राशीच्या लोकांनी खूप सावध राहण्याची गरज
शनी सध्या कुंभ राशीत आहे आणि दोन राशी आहेत ज्या शनीच्या प्रभावामुळे त्रासलेल्या आहेत. कर्क आणि वृश्चिक या दोन राशी आहेत. या राशीच्या लोकांनी खूप सावध राहण्याची गरज आहे. तुमच्याकडून झालेली छोटीशी चूकही तुमच्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे जीवनात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. या काळात या राशीच्या लोकांनी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी.
शनीची ढैय्या असेल तर 'या' चूका करू नका
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी शनिदेवाला सामोरे जावेच लागते. शनीची ढैय्या असेल तर त्या व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत 'या' चूका करू नका
शनि ढैय्या सुरू असेल तर व्यक्तीने मांस आणि मद्यापासून दूर राहावे. विशेषत: शनिवार आणि मंगळवारी व्यक्तीने सात्विक अन्नच सेवन करावे. कोणत्याही मजूर, असहाय किंवा गरीब व्यक्तीला त्रास देऊ नये. असे केल्याने दुष्परिणाम वाढू शकतात.
आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा करू नये. वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी. शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नवीन गुंतवणूकही करू नये. शनीच्या ढैय्यामध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या चुका करू नयेत.
शनीची ढैय्या असेल तर 'हे' काम करा
ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या प्रभावाखाली राशी असलेल्या लोकांनी शनिदेवाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवाची पूजा करण्यासोबतच दर शनिवारी शनिस्तोत्राचे पठण करावे. या राशीच्या लोकांनी दर शनिवारी काही गरजू किंवा स्वच्छता कर्मचार्यांना काहीतरी दान करावे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी धन, वस्त्र किंवा अन्न दान सर्वात उपयुक्त मानले जाते.
शनिदेवाला रुईचे फूल खूप आवडते. धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी हे फूल शनिदेवाला अर्पण केल्याने शनिदेवाच्या प्रभावापासून मुक्ती मिळते. ही फुलं अर्पण केल्याने शनिदेवाची कृपा होते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात. शनिवारी शनिदेवाला आवडत्या वस्तू अर्पण करणे चांगले मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : 2024 मध्ये शनी 'या' राशींना करणार मालामाल! कशी असेल शनिची स्थिती? जाणून घ्या