Shani Dev : पौराणिक मान्यतेनुसार, सूर्यपुत्र शनिदेवाबद्दल असे म्हटले जाते की त्यांचा क्रोधित स्वभाव आणि ग्रहस्थिती कुणाचाही नाश करू शकते. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही. ज्यांचे कर्म चांगले नाही अशा लोकांनाच शनिदेव त्रास देतात. शनिदेव ही न्यायाची देवता आहे. यामुळेच भगवान शिवाने नऊ ग्रहांपैकी न्यायाधीशाचे काम शनिदेवावर सोपवले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? ज्यांच्या क्रोधाला संपूर्ण जग घाबरते ते शनिदेवही या 5 लोकांना घाबरतात…
...म्हणूनच शनिदेवाची पूजा तिळाने केली जाते.
शनि महाराज हे भगवान सूर्य आणि त्यांची दुसरी पत्नी छाया यांचे पुत्र असल्याचे पौराणिक कथेत सांगितले आहे. असे म्हणतात की एकदा रागाच्या भरात सूर्यदेवाने स्वतःच्या मुलाला शनिला शाप दिला आणि त्याचे घर जाळले. यानंतर सूर्याला प्रसन्न करण्यासाठी शनीने पिता सूर्याची काळ्या तीळांनी पूजा केली आणि ते प्रसन्न झाले. या घटनेनंतर शनिदेव आणि त्यांच्या वडिलांची तीळ घालून पूजा केली जाऊ लागली.
हनुमानजींना घाबरतात शनिदेव
असे मानले जाते की, शनिदेव पवनपुत्र हनुमानजींना खूप घाबरतात. म्हणून हनुमानजींचे दर्शन करून त्यांची पूजा केल्याने शनीची वाईट दृष्टी दूर होते असे म्हणतात. हनुमानजींची नियमित पूजा करणाऱ्यांवर शनीच्या ग्रहस्थितीचा फारसा प्रभाव पडत नाही.
शनिदेव भगवान कृष्णाला घाबरतात
आपल्या लीलांमधून लोकांना धडा शिकवणारे भगवान श्रीकृष्ण शनिदेवाचे लाडके मानले जातात. शनिदेवाने आपल्या प्रिय देवाचे दर्शन घेण्यासाठी तपश्चर्या केली होती असे मानले जाते. शनिदेवाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण कोकिळेच्या रूपात प्रकट झाले. तेव्हा शनिदेव म्हणाले होते की, आतापासून कृष्णाजीच्या भक्तांना त्रास देणार नाही.
शनिदेवाला पिंपळाची भीती वाटते
पौराणिक मान्यतेनुसार शनिदेवालाही पिंपळाची भीती वाटते. त्यामुळे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात. पिपलाद मुनींचे नामस्मरण करून पिंपळाच्या झाडाची पूजा करणाऱ्यावर शनिदशेचा फारसा प्रभाव पाडणार नाही, असे शास्त्रात सांगितले आहे.
शनिदेव आपल्या पत्नीलाही घाबरतात
शनी महाराज आपल्या पत्नीला घाबरतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शनीच्या स्थितीत शनीच्या पत्नीच्या नावाने मंत्राचा जप करणे देखील शनिदेवासाठी उपाय मानले जाते. त्याची कथा अशी आहे की, एकदा शनिदेवाची पत्नी रितू स्नान करून शनि महाराजांकडे आली. पण आपले आवडते दैवत श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न असलेले शनि महाराज आपल्या पत्नीकडे ढुंकूनही पाहत नव्हते. तेव्हा त्यांच्या पत्नीला राग आला आणि त्यांनी शनिदेवाला शाप दिला.
भगवान शिवालाही घाबरतात शनिदेव
पिता सूर्यदेव यांच्या सांगण्यावरून भगवान शिवाने शनिदेवावर एकदा हल्ला केला होता आणि त्यांना धडा शिकवला होता. यामुळे शनिदेव बेशुद्ध झाले होते. वडिलांच्या सांगण्यावरून भगवान शिवांनी त्यांना पुन्हा शुद्धीत आणले. तेव्हापासून शनिदेव शिवजींना आपला गुरू मानून घाबरू लागले असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 2024 मध्ये शनिचा उदय, 'या' राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार! नोकरी, विवाह, व्यवसायात मोठे यश मिळणार