Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष स्थान देण्यात आले आहे. कोणत्याही जन्मकुंडलीत शनि शुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. अशा लोकांच्या प्रगतीत अडथळे येत असतात आणि त्यांचे काम सतत खराब होत असते. शनिदेवाला प्रसन्न ठेवणे खूप गरजेचे आहे कारण शनिदेव हे एकमेव देव आहेत जे तुम्हाला तुमच्या कर्मानुसार चांगले आणि वाईट फळ देतात. जर तुमच्या कुंडलीत शनि कमकुवत असेल, तर त्याला बळकट करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही सोपे आणि अचूक उपाय जाणून घ्या
शनीला बलवान करण्याचे 4 उपाय
मोहरीच्या तेलाचा दिवा लावा
शनिवार हा शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. शनिवारी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. नंतर काळे वस्त्र अर्पण केल्यानंतर शनि चालिसाचे पठण करावे.
शनिवारी हनुमानाची पूजा करा
ज्योतिष शास्त्रानुसार जो व्यक्ती शनिवारी हनुमानाची पूजा करतो त्याला शनिदोषापासून मुक्ती मिळते. हनुमानाची पूजा करणाऱ्यांवर शनिदेव आपला आशीर्वाद ठेवतात असे म्हणतात. त्यामुळे शनिवारी बजरंगबलीची पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ करा.
7 मुखी रुद्राक्ष धारण करा
ज्योतिष शास्त्रानुसार जो व्यक्ती शनिवारी सात मुखी रुद्राक्ष धारण करतो त्याला शनिदेवाची कृपा प्राप्त होते. शनिवारी गंगेच्या पाण्यात आंघोळ करून धूप आणि दिवा लावा आणि सात मुखी रुद्राक्ष धारण करा. याशिवाय शनिदेवाच्या ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः आणि ॐ शं शनैश्चराय नमः या दोन मंत्रांचा जप करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा, कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीला कधीही त्रास देऊ नका, शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी दान करा.
या वस्तू दान करा
ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत शनि कमकुवत स्थितीत असेल तर शनिवारी काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. काळे हरभरे, काळी उडीद, काळ्या रंगाचे कपडे, काळे तीळ या सर्व गोष्टी शनीच्या वस्तू मानल्या जातात. शनिवारी काळ्या रंगाची विशेष काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 'हे' संकेत दर्शवतात की शनिदेव तुमच्यावर कोपलेले आहेत, महत्त्वाच्या गोष्टी, उपाय जाणून घ्या