Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार, राशींमध्ये भ्रमण करताना शनिदेवाचा प्रभाव पडतो. जो विशेष परिस्थितीमुळे कोणत्याही राशीवर येतो. याला साडेसात वर्षांपर्यंत चालणारी साडेसाती म्हणतात. तर शनि ढैय्याचा प्रभाव अडीच वर्षांपर्यंत असतो.


 


शनीची साडेसाती आणि ढैय्यामध्ये काय फरक आहे?


ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि कोणत्याही राशीच्या 12 व्या भावात किंवा राशीमध्ये, तसेच कोणत्याही राशीच्या दुस-या भावात असतो, तेव्हा त्या राशीवर शनिची साडेसाती सुरू होते. तसेच साडेसातीचा प्रभाव तीन टप्प्यांचा असून प्रत्येकी अडीच वर्षांचे तीन टप्पे आहेत. अशा प्रकारे साडेसात वर्षांचा संपूर्ण कालावधी साडेसातीचा आहे.


 


ढैय्या आणि साडेसातीपासून चांगले किंवा वाईट परिणाम मिळतात


ढैय्याबद्दल सांगायचे तर, संक्रमणादरम्यान जन्मराशीतून जेव्हा शनि चौथ्या किंवा आठव्या भावात असतो, तेव्हा त्याला शनि ढैय्या म्हणतात. शनि ढैय्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. सामान्यतः शनिची साडेसाती किंवा ढैय्या अशुभ आणि कष्टप्रद मानली जाते. पण तसे नाही. कुंडलीतील शनीच्या स्थितीनुसार ढैय्या आणि साडेसातीपासून चांगले किंवा वाईट परिणाम मिळतात. 


 


शनिदेव कोणाला कठोर शिक्षा देतात?


ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये, शनिला कर्मफळ देणारा आणि कलियुगाचा दंडाधिकारी देखील म्हटले आहे. शनि कष्टाचा कारक आहे. त्यांची हालचाल सर्वात मंद आहे, म्हणूनच राशींवर त्यांचा प्रभाव सुमारे अडीच वर्षे टिकतो. कुंडलीतील शनीची साडेसाती, ढैय्या आणि महादशा या काळात शनि व्यक्तीवर सर्वात जास्त प्रभाव टाकतात. प्रश्न असा येतो की शनि कोणत्या लोकांना सर्वात जास्त शिक्षा देतात? जे लोक नेहमी इतरांचे नुकसान करण्यास उत्सुक असतात त्यांना शनि अधिक त्रास देतात. जे दुर्बल घटकातील लोकांना त्रास देतात आणि त्यांचे हक्क हिरावून घेतात. अशा लोकांना शनि नक्कीच कठोर शिक्षा देतात.


साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय


ज्योतिषशास्त्रामध्ये शनीच्या साडेसाती किंवा ढैय्याचे नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी उपायही सांगण्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळी दशरथाने लिहिलेल्या शनिस्तोत्राचे पठण केल्याने शनीची साडेसाती आणि ढैय्याचा प्रभावही कमी होतो. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी काळी उडीद डाळ, काळे कपडे, मोहरीचे तेल, लोखंड आणि गूळ इत्यादी शनिशी संबंधित वस्तू दान करा.



ही खबरदारी घ्या


नेहमी सूर्यास्तानंतरच शनिदेवाची पूजा करा. पूजेत तीळ किंवा मोहरीचे तेल वापरावे, शनिवारी मांसाहार करू नये, पूजेत निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालावेत, काळ्या कुत्र्यांना त्रास देऊ नये.


 


(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev : 2024 मध्ये 'या' 4 राशींना शनिदेव करतील मालामाल! त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत? जाणून घ्या