Shani Dev : जानेवारी 2024 चा पुढचा शनिवार 20 आणि 27 तारखेला येत आहे, ज्या लोकांवर शनि भारी आहे, ज्यांना शनि महाराजांचा आशीर्वाद हवा आहे, त्यांच्यासाठी हा शनिवार खास आहे. नवीन वर्षात शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर 2024 च्या शनिवारी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हे काम करा.


नवीन वर्षात शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर...


कलियुगात न्यायदेवता आणि फळ देणारा देव म्हणून शनिदेवांची पूजा केली जाते. शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत. शनि हे देखील अतिशय सौम्य तसेच क्रूर ग्रह मानले जातात. शनिदेव आपल्या भक्तांवर प्रसन्न राहावेत म्हणून भक्त शनिदेवाची पूजा करतात. जर शनिदेव प्रसन्न झाले तर एखाद्या गरीब माणसाचे रूपांतरण एखाद्या राजामध्ये केव्हा करतील हे सांगता येत नाही. नवीन वर्षात शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर शनिदेवाची आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय अवश्य करा


 


हिंदू धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व


शनिदेवाच्या कृपेचे जीवनात विशेष महत्त्व आहे, ज्योतिषशास्त्रात कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून शनिचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. हिंदू धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शनिवारी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. ज्यांना साडेसाती आहे, अशा एखाद्या व्यक्तीने शनिवारी पूर्ण भक्तिभावाने शनिदेवाची पूजा केली तर शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.


शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हे काम करा


वर्षाच्या पहिल्या शनिवारी गरजूंना ब्लँकेट दान करा. दान केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात. परंतु हे दान जर गरजेनुसार असेल तर ते अधिक शुभ फल देते. नववर्षाच्या शनिवारी कडाक्याच्या थंडीमुळे, आपण ब्लँकेट दान करणे आवश्यक आहे. वर्षाच्या पहिल्या शनिवारी तुम्ही काळे शूज दान करू शकता.



ज्या राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या किंवा शनीची साडेसाती आहे, त्यांना या उपायाचा फायदा होऊ शकतो. मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव पडतो, विशेषत: या राशीच्या लोकांनी वर्षाच्या पहिल्या शनिवारी हा उपाय करावा.


त्याच वेळी, वृश्चिक आणि कर्क राशीच्या लोकांवर शनीच्या ढैय्याचा प्रभाव राहील. म्हणूनच या दोन्ही राशीच्या लोकांना वर्षाच्या पहिल्या शनिवारी या उपायांनी शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते.



या शनिवारी शनिदेवाची योग्य प्रकारे पूजा केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल. या दिवशी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन नक्की करावे. तसेच शनिदोषापासून मुक्ती आणि शनिदेवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा.


 


शनीची साडेसाती म्हणजे काय? 


ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती साडेसात वर्षे राहते. ज्याच्या आयुष्यात साडेसाती असेल, ती साडेसात वर्षांपर्यंत टिकते, 22 वर्षांनी पुन्हा तुमच्या आयुष्यात शनीची साडेसाती येते. चंद्रावरून मार्गी होत असताना शनिदेव बाराव्या भावात येतात तेव्हा शनि साडेसाती सुरू होते. शनिदेव सर्वांच्या कर्माचा हिशोब ठेवतात. शनीच्या साडेसातीच्या काळात शनिदेव त्यानुसार फळ देतात.


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 2024 मध्ये शनिदेवाची 'या' राशींवर विशेष कृपा! आर्थिक, वैवाहिक जीवन, करिअरमध्ये प्रगती होईल, नशीब चमकेल