Shani Dev: ते म्हणतात ना. एखाद्याच्या जीवनात अचानक मागोमाग अडचणी आल्या, तर शनि मागे लागला की काय, असे म्हटले जाते. मात्र हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिला कर्मफळदाता तसेच न्यायाधीश म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात संथ गतीने फिरणारा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनि दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो. शनिच्या राशीबदलाचा सर्व 12 राशींवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. ज्योतिषींच्या मते, पुढील वर्षी, 2027 मध्ये, त्याच्या गतीत बदल होईल. ज्यामुळे 4 राशी अशा आहेत. ज्यांचा पुढच्या वर्षी भाग्योदय होत आहे, जाणून घ्या सविस्तर...

Continues below advertisement

पुढच्या वर्षी 4 राशींचा भाग्योदय, शनिची मोठी कृपा...(Shani Dev)

पुढील वर्षी, 2027 मध्ये, शनिचे मीन राशीतून मेष राशीत होणारे संक्रमण अनेक बदल घडवून आणेल. ज्योतिषशास्त्रानुसार, हे संक्रमण विशेषतः 4 राशींसाठी शुभ असेल. या काळात उत्पन्नात वाढ, नवीन करिअरच्या संधी, अडकलेल्या निधीची परतफेड आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जीवनात सकारात्मकता येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, 3 जून रोजी शनी मीन राशी सोडून मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशी ही शनिची दुर्बळ राशी मानली जाते. शनिच्या या संक्रमणाचा परिणाम तसा सर्व 12 राशींवर होईल. मात्र शनिचा हा बदल 4 राशींसाठी विशेषतः शुभ असू शकतो. जाणून घेऊया की 2027 वर्षात 4 राशींना कोणते फायदे मिळू शकतात.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, 2027 वर्षात शनिचे हे संक्रमण मिथुन राशीसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना महत्त्वपूर्ण संधी आणि नवीन व्यावसायिक सौदे मिळू शकतात.

Continues below advertisement

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, 2027 वर्षात शनिच्या संक्रमणानंतर, सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाबद्दल प्रशंसा मिळू शकते. तुम्हाला दीर्घकाळ ठेवलेल्या निधीचा परतावा मिळू शकतो. तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, 2027 वर्षात शनिचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि सकारात्मक परिणाम आणू शकते. तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे नोकरी मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, 2027 वर्षात शनिदेव कुंभ राशीचे स्वामी आहेत. शनिचे संक्रमण कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. या काळात तुमची निर्णयक्षमता मजबूत होऊ शकते. व्यवसायात नवीन गोष्टी करून पाहिल्यास चांगला नफा मिळू शकतो.

हेही वाचा :

Shardiya Navratri 2026: देवी दुर्गेच्या प्रिय 4 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! यंदा नवरात्र सुवर्णकाळ घेऊन येतेय, 58 वर्षींनी राजयोग, प्रगतीच्या नवीन संधी, पैसा, नोकरी, ज्योतिषशास्त्र..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)