Shani Dev: शनिदेवाचे महत्त्व नऊ ग्रहांमध्ये मोठे आहे. शनिदेव हा कर्मफळ देणारा देव मानला जातो. आठवड्यातील 7 दिवसांपैकी शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो. असे मानले जाते की, शनिदेव इतके शक्तीशाली आहेत की, त्यांच्या दूरदृष्टीला देव देखील घाबरतात. सर्व देवतांमध्ये शनिदेव हे अत्यंत कठोर म्हणून ओळखले जातात. यामुळेच शनिदेवांचे नाव ऐकताच लोक घाबरतात. कारण शनि हा असा देव आहे जो आपल्या कर्मानुसार फळ देतो. जर तुम्ही चांगले काम केले असेल तर तुम्हाला शनिदेवाची कृपा नक्कीच मिळेल. ज्या व्यक्तीवर शनिदेवाचा आशीर्वाद असतो त्याचे चांगले दिवस सुरू होतात. पण जर तुम्ही वाईट कृत्ये केली असतील तर शनिदेव तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच देतात. यामुळेच प्रत्येक व्यक्तीला शनिदेवाच्या अशुभ दृष्टीचा प्रभाव पडू नये आणि शनिदेव नेहमी त्याच्यावर प्रसन्न राहावेत अशी इच्छा असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत हे कसे ओळखायचे? असे काही संकेत जाणून घ्या, जे फार कमी लोकांना माहीत असावीत.

शनिदेवाचा तुमच्यावर खरोखर कोप झाला असेल तर...

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनिदेव कोपतात, तेव्हा जीवनात काही संकेत दिसू लागतात. याची ओळख करून तुम्ही शनिदेव तुमच्यावर कोपला असल्याचे समजू शकता. तुम्हीही या समस्यांशी झगडत असाल किंवा हे संकेत दिसत असतील तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय अवश्य करा.

'हे' संकेत शनिदेव तुमच्यावर नाराज असल्याचे दर्शवतात

  • जर शनिदेवाचा कोप झाला असेल तर संपूर्ण घरात नकारात्मकता पसरते. 
  • कष्ट करूनही माणसाला यश मिळत नाही आणि प्रत्येक कामात अडथळे येतात. 
  • तुमच्यासोबत असे होत असेल तर समजा शनिदेव तुमच्यावर खूप नाराज आहेत.
  • घरामध्ये नेहमीच आर्थिक कोंडी राहणे हे देखील शनिदेवाच्या नाराजीचे लक्षण आहे. 
  • जेव्हा शनिदेव कोपतात तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होते. माणूसही कर्जात बुडतो.
  • परस्पर संबंध बिघडणे हे देखील शनिदेवाच्या नाराजीचे लक्षण आहे. 
  • नात्यातील कलह, भांडणे आणि वाद यांसारखी परिस्थिती शनीची कृपा तुमच्यावर नाही हे दर्शवते. 
  • अशा परिस्थितीत केवळ कुटुंबाशीच नाही तर जवळच्या मित्रांशीही संबंध बिघडतात.
  • जवळचे लोक आणि मित्रही तुमच्यापासून अंतर राखू लागतात.
  • कोर्टात सुरू असलेल्या केसमुळे तुम्ही त्रस्त असाल आणि केस तुमच्या बाजूने जात नसेल, तर समजा शनिदेवाची वाईट नजर तुमच्यावर पडली आहे. 
  • शनिदेवाच्या वाईट नजरेमुळे मान-सन्मान नष्ट होतो आणि व्यक्ती कायदेशीर बाबींमध्ये अडकते.
  • घरातील विद्युत उपकरणे सतत खराब होणे हे देखील शनिदेवाच्या नाराजीचे लक्षण आहे. 
  • हे काही अशुभ घटना देखील सूचित करते.

शनिदेवांना प्रसन्न करण्याचे उपाय

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत.

या उपायांचा अवलंब केल्यास शनिदेवाचा अशुभ प्रभाव आणि कोप टाळता येतो.

शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्याचा उत्तम दिवस आहे.

या दिवशी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

पिंपळाच्या झाडाजवळ चार बाजू असलेला दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा.

परिक्रमा करताना शनी बीज मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.

शनिवारी निःस्वार्थपणे आपल्या क्षमतेनुसार काही गोष्टी गरजू, गरीब किंवा मजुरांना दान करा. असे केल्याने शनिदेवाची कृपाही होते.

विशेषत: शनिवारी मोहरीचे तेल, काळी उडीद डाळ, लोखंड, काळे कपडे, बूट, चप्पल, छत्री इत्यादी दान करणे चांगले मानले जाते.

या दिवशी गरिबांना अन्नदान केल्याने शनिही प्रसन्न होतो.

हेही वाचा>>>

Surya Shani Yuti: तब्बल 12 महिन्यांनी बनला सूर्य-शनीचा अद्भूत योग! 'या' 5 राशींचे भाग्य सोन्यासारखं चमकणार, नोकरीत पगारवाढ, धनवृद्धीचे संकेत?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

ब्रेकिंग तसेच ताज्या बातम्यांसाठी पाहा...