Shani Dev: ते म्हणतात ना देवाच्या काठीला आवाज नसतो, उशीर लागतो, पण त्याचा न्याय होतोच, हिंदू धर्मात, शनिदेवाला न्याय आणि कर्माचे फळ देणारी देवता मानले जाते. शनिदेव निःपक्षपातीपणे न्याय देतात, चांगल्या लोकांना सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करतात, क्रूर, गर्विष्ठ तसेच अधर्मी लोकांना धडा शिकवण्यासाठी, ते त्यांना त्यांच्या जीवनकाळात यातना देतात, ज्याला शनिची साडेसाती म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या हालचालीच्या व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होतो, त्यापैकीच एक म्हणजे नक्षत्र बदल... कारण त्याचा परिणाम व्यक्तीच्या करिअर, आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध आणि मानसिक स्थितीवर होतो. ज्योतिषींच्या मते, पुढचे 6 महिने 3 राशींसाठी अत्यंत कठीण असण्याची शक्यता आहे, जाणून घ्या...
पुढचे 6 महिने 3 राशींची सत्त्वपरीक्षा! शनिचं नक्षत्र भ्रमण वाढवणार टेन्शन...(Shani Transit 2026)
शनिने नुकतेच रेवती नक्षत्रात (17 मे) प्रवेश केला आहे आणि तो तेथे बराच काळ (9 ऑक्टोबर) राहील. शनीचे हे संक्रमण काही राशींसाठी आव्हानात्मक काळ आणू शकते. हे संक्रमण तीन राशींसाठी समस्या वाढवू शकते. या राशींना आर्थिक बाबी, नातेसंबंध आणि करिअरमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्या राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मिथुन (Gemini)
ज्योतिषींच्या मते, शनि नक्षत्र भ्रमणाचा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी त्यांच्या कामात आव्हानात्मक ठरू शकतो. काम आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे मानसिक ताण आणि चिडचिड निर्माण होऊ शकते. काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन साधणे कठीण होऊ शकते. तुमची आर्थिक परिस्थिती देखील दबावाखाली येऊ शकते, ज्यामुळे अनेक महत्त्वाच्या कामांवर परिणाम होईल.
सिंह (Leo)
ज्योतिषींच्या मते, येणारे 6 महिने तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या थोडे कठीण असू शकतात. खर्चात अचानक वाढ झाल्यामुळे तुमचे बजेट विस्कळीत होऊ शकते आणि निधीअभावी काही महत्त्वाची कामे थांबून राहू शकतात. तुमच्या कौटुंबिक जीवनातही तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. शिवाय, तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल.
धनु (Sagittarius)
ज्योतिषींच्या मते, पुढचे 6 महिने तुमच्यासाठी मानसिक ताण आणि गोंधळाने भरलेला असू शकतो. शनीच्या ढैय्याचा प्रभाव चालू असलेल्या कामात अडथळा आणू शकतो. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो आणि घरातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा
