Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिची (Shani Dev) नेहमी खऱ्या लोकांवर नेहमीच कृपा असते. जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्यापाठी शनि नेहमीच पाठीशी असतात. शनिदेव प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमणासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. कुंडलीत शनिची स्थिती चांगली असल्यास राशींवर शुभ परिणाम होतो. त्यानुसार शनिच्या प्रिय राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

या राशीच्या लोकांच्या भाग्याचा स्वामी ग्रह शनि आहे. त्यामुळे या राशीला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, शनिमुळे तुमच्या जीवनात सुख-शांती येते. तुम्ही केलेल्या कर्माचं तुम्हाला चांगलं फळ मिळतं. शनिदेवाच्या कृपेने या राशीला संयम, परिश्रम यांसारखे गुण शिकता येतात. आयुष्यात प्रगती करता येते. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांवर देखील शनिची कृपा असते. या लोकांचं वैवाहिक जीवन सुरळीत चालतं. तसेच, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळतो. या राशीच्या लोकांसाठी शनि स्त्रोताचं पठण करणं शुभकारक मानलं जातं. 

Continues below advertisement

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ रास ही शनिदेवाची आवडती रास आहे. या राशीच्या लोकांवर नेहमीच शनिची दृष्टी असते. तसेच, समाजात चांगला मान-सन्मान मिळतो. कामाच्या बाबतीत या राशी कधीच हलगर्जीपणा करत नाहीत. शिक्षणातही या व्यक्ती पुढे असतात. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. शनिच्या कृपेमुळेच या राशीचे लोक संकटावर मात करतात. भौतिक सुख-शांती मिळते. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळते. आयुष्यात अनेक अडचणी आल्या तरी या राशींना त्यावर मात करता येते. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनि आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनिची नेहमी कृपा असते. तुमच्या कार्यातील अडथळे दूर होतात. आणि भविष्यावर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करता. या राशीच्या लोकांना आर्थिक तंगीचा सामना फार कमी करावा लागतो. कारण या राशीचे लोक फार खर्चिक नसतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :         

December Grah Gochar 2025 : डिसेंबर महिन्यात 5 मोठ्ठ्या ग्रहांचं महासंक्रमण; मेष, धनुसह 'या' राशींना लागणार लॉटरी, हातात येणार पैसाच पैसा