Shani Dev: हिंदू धर्मात तसेच ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाला कर्माचे फळ देणारी देवता म्हणून शनिदेवांना संबोधले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पाहायला गेलं तर, त्यांच्या सारखा न्यायाधीश कोणीही नाही. याचा अर्थ ते कोणाशीही भेदभाव करत नाहीत, तसेच एखाद्याच्या कृतीसाठी योग्य बक्षीस देतात. ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिलच्या शेवटी शनी महाराज यांना आपला मार्ग बदलला आहे. त्याचवेळा त्यांचे हे संक्रमण अनेक राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. या राशीच्या लोकांना लवकरच त्यांच्या नोकरी, आर्थिक स्थिती, व्यवसायाबाबत चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तो आयुष्याचा भरपूर आनंद घेतील. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?
अक्षय्य तृतीयेआधी शनिदेवाने बदलला मार्ग!
ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाचा स्वामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिदेवाने आज आपला मार्ग बदलला आहे. यासह 3 राशींसाठी शुभ मुहूर्त सुरू झाला आहे. एक मोठी 'गुड न्यूज' त्यांची वाट पाहत आहे. तसं पाहायला गेलं तर शनि ग्रह सर्वात संथ हालचाल करणारा ग्रह आहे. साधारण अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतो. यासोबतच ते वेळोवेळी नक्षत्रांचे संक्रमणही करत असतो. अक्षय्य तृतीयेआधी 28 एप्रिलच्या संध्याकाळी शनिने स्वत:च्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. ज्याचा सकारात्मक परिणाम काही राशींवर होताना दिसत आहे.
शनी नक्षत्र परिवर्तन 2025 कोणासाठी ठरणार भाग्यशाली?
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिलच्या शेवटी होणारे शनिदेवाचा राशी बदल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. ते तुमच्या कुंडलीतील सहाव्या घरातून जात आहेत. या शुभ संयोगामुळे तुम्हाला जुन्या कर्जापासून मुक्ती मिळू शकते. तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. घरात चारचाकी येण्याची शक्यता आहे. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाच्या नक्षत्राचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमच्या कुंडलीत कर्मांचे फल देणारा शनि भाग्य स्थानात आहे. ही एक शुभ स्थिती आहे. परिणामी, तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. मे महिन्यात तुम्हाला नोकरीत पदोन्नतीची भेट मिळू शकते. संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर खूप वर्षाव करणार आहे. तुमच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत असू शकतात. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. जे लोक अनेक वर्षांपासून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला असेल. शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते.
हेही वाचा :
May 2025 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचे नशीब 'मे' महिन्यात पालटणार! धनलाभाचे संकेत, मासिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)