Shani Dev 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिला (Shani Dev) फार महत्त्व आहे. कारण शनिची कृपा जर एखाद्या राशीवर पडली तर त्या राशीला दीर्घ काळापर्यंत लाभ मिळतो. त्यामुळेच, शनिच्या संक्रमणाला, वक्री आणि मार्गी चालीला फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे, वर्षाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कोणकोणत्या राशींवर (Zodiac Signs) शनिची साडेसाती असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

कुंभ रास (Saggitarius Horoscope)

कुंभ राशीचा स्वामी ग्रह स्वत: शनि देव आहे. त्यामुळेच पैशांच्या बाबतीत या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. तसेच, तुमच्या कुटुंबात काही शुभकार्य असतील तर ते निर्विघ्नपणे पार पडण्यात अनेक अडथळे निर्माण होतील. मात्र, या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवतील. घरगुती कामांच्या संदर्भात तुम्हाला तणावसुद्धा जाणवू शकतो. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक अस्थिरता जाणवेल. तुमचा तणाव सतत वाढत जाईल. तसेच, वैवाहिक जीवनात देखील तुमचा संघर्ष सुरु राहील. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ कदाचित तुम्हाला वेळेत मिळणार नाही. मात्र, कालांतराने तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील. तसेच, घरातील वातावरण देखील सामान्य राहील. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीचा काळ काहीसा आव्हनात्मक असेल. या काळात तुम्ही केलेल्या कर्माचं फळ कदाचित तुम्हाला वेळेत मिळणार नाही. तसेच, तुमच्या शत्रूची तुमच्या कामावर विशेष नजर राहील. त्यामुळे त्यापासून सावध राहा. तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावणार तर नाही ना याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांवर शनि महाराजांच्या ढैय्याचा प्रभाव असणार आहे. या राशीच्या लोकांनी नवीन वर्षात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या घरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसेल. छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला राग येईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार नाही. मुलांचं अभ्यासात मन रमणार नाही. मात्र, या कालावधीत तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांवर देखील शनिच्या ढैय्याचा प्रभाव असणार आहे. या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, या कालावधीत तुम्हाला मानसिक तणाव, वैचारिक मतभेद जाणवू शकतात. वाहनाशी संबंधित तुम्हाला खर्चही होऊ शकतो. यासाठी विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, समोर आलेल्या संकटांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करा. शत्रूवर विजय मिळवा. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 3 January 2026 : आज शनिवारच्या दिवशी 8 राशींना मिळणार लाभ तर 4 राशी संकटात; शनि महाराज देणार कर्माचं फळ, आजचे राशीभविष्य