Shani Dev 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) महत्त्वाचा ग्रह मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, तो एका राशीत सुमारे अडीच वर्षं राहतो आणि नंतर राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात शनि हा न्याय आणि कर्माचं फळ देणारा ग्रह मानला जातो. सध्या शनिदेव त्याच्या मूळ राशीत, म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे आणि 29 जूनला कुंभ राशीत राहूनच शनि वक्री (Shani Vakri 2024) होईल. वक्री म्हणजे उलटी चाल. शनिदेव 135 दिवस वक्री स्थितीत, म्हणजेच उलट स्थितीत राहील. शनीच्या वक्रीचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होईल, परंतु 4 राशीच्या लोकांना अधिक आर्थिक लाभ होईल आणि त्यांचं नशीब उजळेल. या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया. 


वृषभ रास (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या कर्म घरामध्ये, म्हणजेच तुमच्या कुंडलीच्या दहाव्या घरात शनि वक्री चालीत फिरेल. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी प्राप्त होतील. नोकरदार लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठं पद मिळू शकतं, याशिवाय पगार आणि पदोन्नतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे येणारे 135 दिवस तुमच्यासाठी खूप शुभ होतील. 


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल शुभ ठरेल. तुमच्या सहाव्या घरात शनिदेव वक्री असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला वादातून आराम मिळेल, तुमच्या शत्रूंचा पराभव होईल. कोर्ट केसेसमध्ये तुमचा विजय होईल. कौटुंबिक जीवनात सुखसोयींचा आनंद घ्याल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या पगारात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या चालीतील बदलामुळे प्रचंड लाभ होईल. या राशीच्या लोकांसाठी शनीची उलटी चाल वरदानापेक्षा कमी नाही. तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुम्हाला चांगल्या संधी चालून येताना दिसतील. तुमचं उत्पन्न वाढल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. वैवाहिक आणि प्रेम जीवनात मधुर संबंध राहतील. 


कुंभ रास (Aquarius)


कुंभ ही शनिदेवाची स्वतःची राशी आहे आणि या राशीत राहून शनिदेव वक्री होणार आहे. तुमच्या राशीच्या चढत्या घरात शनिदेव वक्री होईल, त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Rajyog : 1 जूनला बनतोय शक्तिशाली राजयोग; मेषसह 'या' 3 राशीचे लोक रातोरात श्रीमंत होणार, भौतिक सुख वाढणार