Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली रास बदलतात, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर तसेच जगावर दिसून येतो. सर्व ग्रहांमध्ये शनि (Shani) हा सर्वात विशेष ग्रह मानला जातो, कारण हा एकमेव ग्रह आहे जो एकदम संथ गतीने फिरतो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षं राहतो आणि त्यामुळे व्यक्तीवर शनीचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. शनि सध्या कुंभ राशीत आहे.
अशातच मंगळावर (Mars) शनीची तिसरी दृष्टी पडली आहे. 12 जुलैपर्यंत मंगळावर शनीची तिसरी अशुभ दृष्टी असेल. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांच्या जीवनावर याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या काळात कोणत्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांना सावध राहावं लागेल? जाणून घेऊया.
तूळ रास (Libra)
शनीची तिसरी दृष्टी तूळ राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव टाकेल. या राशीच्या लोकांना जीवनात अनेक अपयशांना सामोरं जावं लागू शकतं. घरामध्ये काही मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे, अशा स्थितीत मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही तसं न केल्यास चांगलं राहील, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. करिअर क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर, तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे, कारण तुमचे सहकारीच तुमचे शत्रू होऊ शकतात. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसानीबरोबरच प्रगतीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. व्यवसायातही थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा, कारण तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. वैवाहिक जीवनात काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत संयमाने आणि शांतपणे काम घेण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास (Scorpio)
मंगळावर शनीची तिसरी दृष्टी असल्यामुळे या राशीच्या लोकांनाही अशुभ प्रभावांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. वाटेत अनेक संधी हुकल्या जाऊ शकतात. अशा स्थितीत तुम्हाला निराशेसोबतच तणावाचाही सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणाशीही विनाकारण वाद घालणं टाळा, कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. यासोबतच तुमच्या प्रमोशनवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्यावर कामाचा ताण जास्त राहील. कुटुंबातही काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. आरोग्याबाबत थोडे सावध राहा.
कन्या रास (Virgo)
या राशीच्या लोकांना शनीच्या अशुभ दृष्टीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. छोट्या-छोट्या कामांसाठीही तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. कामांमध्ये सकारात्मक परिणाम न मिळाल्यामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. पैशांच्या बाबतीत थोडं सावध राहा, कारण या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशांचा तुटवडा इतका तीव्र असेल की कर्ज घेण्याची देखील गरज भासू शकते. व्यवसायातही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेणं टाळा. वैवाहिक जीवनातही काही समस्या उद्भवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: