Shani Budh Yuti 2026 : तब्बल 30 वर्षांनी नशिबाचे दार उघडणार, मीन राशीत शनि-बुधाची युती; 11 एप्रिलपासून लॉटरी लागलीच समजा
Shani Budh Yuti 2026 : मीन राशीत शनि-बुधाची युती तीन राशींसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या राशींना जबरदस्त आर्थिक लाभ मिळणार आहे.

Shani Budh Yuti 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, वाणी, व्यवसाय आणि बुद्धीचा कारक ग्रह म्हणजेच बुध ग्रह (Mercury) लवकरच राशी परिवर्तन करणार आहे. 11 एप्रिल रोजी बुध ग्रह मनी राशीत संक्रमण करणार आहे. तर, 30 एप्रिलपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. मीन राशीत शनि (Shani Dev) आधीपासूनच विराजमान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आणि शनि ग्रह मीन राशीत आल्यामुळे यांची युती तब्बल 30 वर्षांनंतर होणार आहे.
मीन राशीत शनि-बुधाची युती तीन राशींसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या राशींना जबरदस्त आर्थिक लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनि-बुधाचं संक्रमण फार शुभकारक तसेच, सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ झालेली दिसेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. तसेच, करिअरमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला ट्रान्सफर करता येणार आहे. तसेच, प्रेमाच्या बाबतीत तुमचं आकर्षण वाढेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनि-बुधाची युती लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. पैशांची आवक वाढेल. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर त्यासाठी हा शुभ काळ असणार आहे. तसेच, वैवाहिक नात्यात चांगला गोडवा दिसून येईल. तुमच्या वाणीत गोडवा निर्माण होईल. तसेच, अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी बुध-शनिची युती फार भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांहला लाभ मिळेल. उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात दिसून येईल. व्यवसायाचा चांगला विस्तार वाढेल. मित्रांचं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















