Shani Budh Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, शनि ग्रहाच्या हालचालीमुळे अनेकांच्या जीवनात मोठे बदल घडून येताना दिसत आहेत. यापूर्वी 29 मार्च 2025 या दिवशी शनिने मीन राशीत प्रवेश केला, ज्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या काळात म्हणजेच सोमवारी 28 एप्रिल 2025 रोजी शनिने नक्षत्र बदलले. ज्यानंतर आता शनिची अनेक ग्रहांशी युती होत असल्याने विविध योग तयार होतायत. ज्यामुळे अनेकांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिन्याची सुरूवात खास असणार आहे. जेव्हा बुध ग्रह आणि कर्म दाता शनि हे एकमेकांपासून 18 अंशाच्या टोकवर असणार आहेत. तेव्हा अष्टादश योग तयार होतोय. 12 राशीच्या लोकांवर या योगाचे वेगवेगळे शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहेत. अष्टादश योग काही राशींसाठी भाग्य आणेल, ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 राशी?
12 राशीच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांचा सर्व राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शनि मिळून अष्टादश योग तयार होतो. ज्याचा 12 राशीच्या लोकांवर वेगवेगळे शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. अष्टादश योग काही राशींसाठी भाग्य आणेल, ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या आहेत ती 3 राशी?
अष्टदश योगामुळे 3 राशींचे नशीब फळफळणार
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 1 मे रोजी बुध आणि शनि एकमेकांच्या 18 अंशाच्या कोनीय स्थितीत असल्यामुळे अष्टदश योग तयार होत आहे. कोणत्या 3 राशींना नोकरी, व्यवसायापासून ते करिअरपर्यंतच्या बाबतीत नशीब मिळू शकते.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. आत्मविश्वास वाढेल. चांगल्या कर्मांचे शुभ फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार कराल आणि त्यात यशस्वीही व्हाल. तणावापासून दूर राहाल. कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. पदोन्नती आणि उत्पन्न वाढीच्या संधी आहेत.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीचा योग फलदायी ठरेल. सकारात्मक बदलांमुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधात यश मिळवू शकाल. मालमत्तेशी संबंधित लाभ होऊ शकतात. घरात शांततेचे वातावरण राहील. प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल. धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत गोडवा वाढेल.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुधाचा संयोग लाभदायक ठरेल. संपत्तीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत शोधू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही चिंतेपासून मुक्त व्हाल. स्थावर मालमत्तेशी संबंधित लाभ होऊ शकतात.
हेही वाचा :
29 एप्रिल तारीख जबरदस्त! शुभ योगांनी 'या' 5 राशींचं नशीब चमकणार, हातात खेळेल पैसा, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)