Shani Asta 2024 : सध्या शनिदेव (Shani Dev) कुंभ राशीत विराजमान आहेत. 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:56 वाजता शनि कुंभ राशीत अस्त झाला असून 18 मार्चपर्यंत तो या स्थितीत राहील. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेवाला पापी आणि क्रूर ग्रह म्हणतात. शनिदेवाच्या अशुभ प्रभावाची भीती सर्वांनाच असते, पण असं नाही की शनिदेव फक्त अशुभ परिणामच देतात. शनिदेव काही राशींना शुभ फळ देखील देतात.
जेव्हा शनिदेव शुभ स्थितीत असतो तेव्हा माणसाचे निद्रिस्त भाग्यही जागृत होते. शनिदेव गरीबालाही राजा बनवू शकतो. आता या वेळी शनिच्या अस्तामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे, तर काही राशींना या काळात स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सर्व राशींवर शनि अस्ताचे काय परिणाम होणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनि अस्त अवस्थेत असेपर्यंतच्या काळात तुमचं मन अस्वस्थ राहील. तुमच्याच आत्मविश्वासाची कमतरता असू शकते. व्यवसायासाठी तुम्ही इतर ठिकाणी जाऊ शकता. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
वृषभ रास (Taurus)
18 मार्चपर्यंतच्या काळात तुम्हाला मानसिक शांति मिळेल, पण तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव राहील. धार्मिक कामांमध्ये रस वाढेल. कला किंवा संगीताची आवड वाढू शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
मिथुन रास (Gemini)
शनि अस्त अवस्थेत असेपर्यंतच्या काळात तुमचं मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबात धार्मिक कार्यं निघू शकतात. भौैतिक सुखात वाढ होईल. या काळात तुम्ही जास्त मेहनत कराल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
कर्क रास (Cancer)
पुढील एक महिन्याचा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल, या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. वाणीवरील प्रभाव वाढेल. वडिलोपार्जित व्यवसाय पुन्हा सुरू होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून तुम्हाला पैसे मिळू शकतात.
सिंह रास (Leo)
शनीचा अस्त काळ तुमच्यासाठी चांगला असेल. या काळात तुम्हाला एखाद्या मित्राची मदत मिळू शकते. मित्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करू शकता. 18 मार्चपर्यंतचा काळ तुमच्यासाठी धावपळीचा असेल, पण याच सोबत अनेक चांगल्या गोष्टी देखील घडतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीसाठी 18 मार्चपर्यंतचा काळ चढ-उतारांचा राहील. या काळात तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं, स्वत:वर नियंत्रण ठेवा. या काळात तुम्ही जास्त मेहनत घ्याल. व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी मिळतील. व्यवसायासाठी परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. या काळात तुमचे खर्च वाढतील.
तूळ रास (Libra)
एक महिन्याच्या काळात तुमच्या व्यवसायात विस्तार होईल, यादरम्यान तुमची अधिक धावपळ होईल. व्यवसायातील नफा वाढेल. नोकरी करणाऱ्यांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
धनु रास (Sagittarius)
18 मार्चपर्यंतचा काळ धनु राशीसाठी अनुकूल राहील, तुमचे सर्वांशी चांगले संबंध राहतील. बोलण्यात गोडवा राहील. आईचा जास्त सहवास लाभेल. व्यवसायात बदलांसह वाढ देखील होऊ शकते. तुम्हाला एखाद्या मित्राकडून सहकार्य मिळू शकते.
वृश्चिक रास (Scorpio)
शनि अस्ताचा काळ तुमच्यासाठी लाभदायी असेल. या काळात तुम्हाला पावलोपावली यश मिळेल. करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात.
मकर रास (Capricorn)
शनिदेवाच्या अस्तामुळे मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. या राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसती चालू आहे, त्यातच शनीच्या अस्तामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. मकर राशीच्या लोकांना करिअर क्षेत्रात खूप त्रास होईल. तुमच्या प्रगतीत अडथळे येतील, नोकरीत बढती थांबू शकते.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसती सुरू आहे. शनीच्या अस्तादरम्यान कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतील. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. जोडीदाराशी वाद इतके वाढू शकतात की त्यामुळे विभक्त होण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces)
शनि अस्ताचा तुमच्या जीवनावर शुभ प्रभाव राहील. तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात वाढ होईल, लाभाच्या संधीही मिळतील. व्यवसायाच्या विस्तारासाठी तुम्हाला पालकांकडून पैसे मिळू शकतात. व्यवसायात नफा वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Asta 2024 : शनीचा कुंभ राशीत अस्त; 'या' 3 राशींच्या समस्या वाढणार; आयुष्यात येणार मोठं वादळ