Shani Asta 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) सर्वात क्रूर ग्रह मानलं जाते. कारण शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. त्याचबरोबर शनी हा असा एकुलता एक ग्रह आहे ज्याच्याकडे शनीची ढैय्या आणि साडेसातीचा हक्क आहे. तसेच, शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत स्थित असतो. 


ज्योतिष शास्त्रानुसार, शनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अस्त होणार आहे. शनी कुंभ राशीत अस्त होणार आहेत. मात्र, त्यांचा उगम मीन राशीत होणार आहे. शनीच्या अस्ताने अनेक राशींन लाभ मिळणा आहे. तर काही राशींच्या अडचणी वाढणार आहेत. या राशींना सावधान राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 07.01  मिनिटांनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. तर, 37 दिवसांपर्यंत अस्त अवस्थेत राहून 06 एप्रिल 2025 रोजी उदय होणार आहे. त्याचबरोबर, 26 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या अकराव्या चरणात शनी अस्त होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सावधान राहण्याची गरज आहे. या काळात विनाकारण तुमच्या पैशांत वाढ होऊ शकते. त्यामुळे कुठेही पैसा खर्च करताना विचारपूर्वक खर्च करा. तसेच, शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवणार असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या नोकरीत देखील समस्या उद्भवू शकतात. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. तसेच, तुमचे या काळात अनेक खर्च वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही कर्जही घेऊ शकणार नाही. तुमच्या कुटुंबात तुम्हाल अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, वैवाहिक जीवनात तुम्हाला अनेक अडथळे जाणवतील. तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांना या काळात आर्थिक, मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कुटुंबात काही कारणास्तव वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच, तुमचा दिर्घकालीन आजार तुम्हाला पुन्हा उद्भवू शकतो. कोणताही निर्णय घेताना तुम्ही कुटुंबियांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 5 राशींचं भाग्य उजळणार, मिळतील नवीन संधी