Shani Ast 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि देव (Shani Dev)13 मार्च 2026 रोजी मीन राशीत अस्त होणार आहे. ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, ग्रहांचा सेनापती मंगळ आणि बुध ग्रहसुद्धा अस्त होणार आहे. अशा प्रकारे तीन मोठे ग्रह एकत्र अस्त होणार आहेत. त्यामुळे तीन राशींसाठी हा काळ फार नुकसानकारक ठरु शकतो. या काळात तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. तसेच, तुमच्या करिअर, व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो. या राशी (Zodiac Signs)कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
तीन मोठ्या ग्रहांचा अस्त होणं कर्क राशीसाठी चिंताजनक ठरु शकतो. या काळात तुमच्या कामामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. घरातील वातावरण तणावपूर्वक राहील. तसेच, कोणतेही मोठे निर्णय घेण्याच्या आधी नीट विचार करा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, जर तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ योग्य नाही. महत्त्वाच्या कामांना आधी प्रोत्साहन द्या.
कन्या रास (Virgo Horoscope)
शनि-मंगळ-बुध ग्रहाचं अस्त होणं कन्या राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरु शकतं. या काळात तुमच्या वैयक्तिक जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. तसेच, तुमच्या मेहनतीप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. आर्थिक स्थिती खालावू शकते. या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका. तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, या कालावधीत लांबचा प्रवास करणं टाळा.
मकर रास (Capricorn Horoscope)
कर्क, कन्या राशीप्रमाणेच मकर राशीसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात पैशांचा प्रवाह कमी असेल. तुम्हाला आर्थिक चणचण भासेल. या कालावधीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तसेच, आरोग्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. पार्टनरबरोबर सामंजस्याने वागा. या कालावधीत तुमच्यात अनेक वादविवाद होऊ शकतात. अशा वेळी न डगमगता सामंजस्याने संवाद साधा.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
