Shani Amavasya 2025 : हिंदू सनातन धर्मात अमावस्या तिथीला वेगळं महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पितरांची पूजा केल्याने घरात सुख शांती नांदते. तसेच, अमावस्या तिथीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने, पितरांसाठी श्राद्ध तर्पण करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर, शनिवारच्या दिवशी अमावस्या तिथी आल्याने याला शनि अमावस्या (Shani Amavasya) देखील म्हणतात. येत्या 23 ऑगस्टला अमावस्या तिथीचा हा शुभ योग जुळून येणार आहे.
यंदाच्या अमावस्येला श्रावण महिना संपणार आहे. तर, भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अमावस्येचं महत्त्व आहेच. मात्र, या दिवशी शनिवार असल्या कारणाने हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनि अमावस्या पाळली जाणार आहे.
हिंदू धर्मानुसार, या तिथीचं विशेष महत्त्व आहे. कारण हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. मान्यतेनुसार, या दिवशी विधीवत शनि देवाची पूजा केल्याने शनि दोषापासून मुक्ती मिळते. तर, शास्त्रानुसार, या दिवशी काही चुका केल्यास शनि महाराज नाराज होऊ शकतात. त्यामुळे या दिवशी काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.
शनि अमावस्येला 'या' गोष्टी करु नका
- शनि अमावस्येच्या दिवशी तेल आणि तिळाचं दान करणं शुभ मानलं जातं. पण, अमावस्येच्या दिवशी या वस्तूंची खरेदी करु नये. अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतात.
- या दिवशी भक्तांनी तामसिक आहार म्हणजेच मांस, अंडी, मासे आणि मद्यपानाचं सेवन करु नये. यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात.
- शास्त्रानुसार, या दिवशी मीठ देखील खरेदी करु नये. हे अशुभ मानलं जातं. एक प्रकारे यामुळे आपल्यावर आर्थिक संकट ओढावू शकतं.
- या दिवशी चुकूनही केस किंवा नखं कापू नये. मान्यतेनुसार, यामुळे शनि दोषाचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो.
- शनि अमावस्येच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. तसेच, कोणाचा अपमान करु नये.
जर तुम्ही शनि अमावस्येच्या दिवशी या चुका केल्यात तर शनि देव नाराज होऊ शकतात. तसेच, अनेक वर्षांसाठी तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा मिळू शकते. त्यामुळे या चुका करण्याची चूक अजिबात करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :