Shani Amavasya 2025: वैदिक पंचागानुसार, 2025 मध्ये, 29 मार्च हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. या दिवशी शनी अमावस्या आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी ब्रह्म आणि इंद्र योगाचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. जाणून घेऊया शनि अमावस्येला बनणाऱ्या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना लाभ होण्याची शक्यता आहे? 

ब्रह्म-इंद्र योगाचा फायदा, 12 राशींच्या जीवनावर थेट परिणाम 

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 29 मार्च हा दिवस खऱ्या अर्थीने खास असेल, कारण या दिवशी शनिचे मीन राशीत संक्रमण होईल, जिथे तो सुमारे अडीच वर्षे राहील. यासोबतच शनी अमावस्याही असल्याने हा दिवस खूप खास आहे, या दिवशी ब्रह्म आणि इंद्र योग तयार होत आहे, ज्याचा थेट परिणाम 12 राशींच्या जीवनावर होईल. चला जाणून घेऊया शनि अमावस्येला ब्रह्म आणि इंद्र योगाच्या दुर्मिळ संयोगामुळे कोणत्या राशींना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.

या 3 राशीच्या लोकांना होईल फायदा!

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी शनि अमावस्येचा सण शुभ असणार आहे. एखादे काम दीर्घकाळ रखडले असेल तर आता त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये प्रेम वाढेल आणि कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत बनू शकतो. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी मार्चच्या अखेरीस लग्न होऊ शकते.

कर्क 

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांना कर्मफल देणाऱ्या शनिदेवाच्या आशीर्वादाचा लाभ होण्याची शक्यता आहे. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लवकरच लग्न होऊ शकते. आगामी काळात व्यावसायिकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागणार नाही. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी मिळेल. दुकानदार त्यांच्या वडिलांच्या नावावर घरे खरेदी करू शकतात.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांना 29 मार्च 2025 रोजी ब्रह्म आणि इंद्राच्या दुर्मिळ संयोगाचा लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल, त्यानंतर ते स्वतःचे घर खरेदी करू शकतील. व्यावसायिकांचा नफा वाढेल आणि परदेशात व्यवसाय वाढू शकेल. जे लोक 40 च्या वर आहेत, त्यांचे आरोग्य बदलत्या हवामानात चांगले राहील.

हेही वाचा>>

Shani Dev: शनि अमावस्या, सूर्यग्रहण, शनि संक्रमणाचा महादुर्लभ योगायोग! 'या' राशी होणार श्रीमंत? कोण होणार कंगाल? 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)