Shani Amavasya 2022 : वर्षातील शेवटची शनिश्चरी अमावस्या आज 27 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठीही हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. याला शनिश्चरी अमावस्या देखील म्हणतात. ही अमावस्या अतिशय विशेष आहे. कारण या दिवशी सिद्ध पद्म आणि शिवासारखे योगही तयार होत आहेत. या योगांचा प्रभाव 5 राशींवर सर्वाधिक राहणार आहे. जाणून घेऊया या राशींबद्दल.


मेष


मेष राशीच्या लोकांवर या योगांचा शुभ प्रभाव राहील. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. त्यांची आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि समाजात त्यांचा सन्मान वाढेल.


मिथुन


मिथुन राशीच्या लोकांसाठी सध्या शनीची ढैय्या सुरू आहे. या दिवशी दान केल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. व्यवसायात अधिक लाभ होईल. तुमच्या मुलाकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.


कन्या


या राशीच्या लोकांसाठी शनिश्चरी अमावस्या विशेष फलदायी असणार आहे. परिश्रमानुसार फळ मिळेल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. जे काही नवीन काम सुरू कराल त्यात यश मिळेल.


तूळ


या राशीत शनीची चालू असलेली ढैय्या लवकरच संपणार आहे. अशा स्थितीत या दिवशी शनिदेवाची पूजा करणे तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल. आयुष्यातील प्रत्येक अडचणीतून सुटका मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील.


मीन


मीन राशीच्या लोकांवरही शनिदेवाची कृपा राहील. या शनिश्चरी अमावस्येला तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या सर्व वाईट गोष्टी घडू लागतील आणि तुम्हाला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल. या दिवशी शुभ योग तयार झाल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील.


आज करा शनिदेवाची मनोभावे पूजा-अर्चना
शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची मनोभावे पूजा-अर्चना पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ फळ देतात. तसेच  ज्या लोकांच्या कुंडलीत साडेसाती आणि शनीची ढैय्या चालू आहे, त्यांनी या दिवशी पूजन आणि उपाय करून शनीचा कोप टाळता येतो. या दिवशी हा उपाय प्रभावी असल्याचे सांगितले जाते.
-शनिअमावस्येला तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता. 
-या दिवशी पिंपळाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करा. 
-यानंतर पिंपळाच्या पाच पानांवर पाच प्रकारची मिठाई ठेवावी 
-पिंपळाच्या झाडाजवळ ठेवावे. 
-शनिदेवाच्या नावाचा मनातल्या मनात जप करा-


-तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :


Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या


Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ