Shami Plant Vastu Tips : हिंदू धर्मात झाडांना, रोपांना फार पूजनीय मानण्यात आलं आहे. असं म्हणतात की, या झाडा-झुडुपांत देवी-दैवतांचा वास असतो. तुळशीच्या रोपानंतर शमीच्या (Shami) रोपाला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. शमीचं रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होतो. तसेच, भगवान हनुमान यांना शमीचं रोप फार प्रिय आहे. त्यामुळे श्रावणात शमीचं रोप घरात लावणं फार शुभकारक मानलं जातं. 


त्याचबरोबर, शमीचं रोप शनीदेवाला फार प्रिय आहे. घरात पवित्र शमीचं रोप कसं लावावं या संदर्भात ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. जर तुम्हीसुद्धा शमीचं रोप घरात लावू इच्छित असाल तर या संबंधित नियम जाणून घेणं गरजेचं आहे. याच नियमांविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


शनी दोष लागतो 


शनीचं रोप लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे की त्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारची अस्वच्छता नसावी. तसेच, शनीच्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारचा कचरा नसावा. हे फार अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की, शनीच्या रोपाजवळ जर अस्वच्छता असेल किंवा कचरा असेल तर शनी दोष लागतो. शनीला शमीचं रोप फार प्रिय आहे. त्यामुळे जर अस्वच्छता दिसेल तर शनीदेव नाराज होतात असं म्हणतात. 


चपला-बूटं ठेवू नका 


शमीचं रोप फार लकी असतं. हे रोप घरात लावल्याने बिझनेस-नोकरीत चांगली प्रगती होते. त्यामुळे या गोष्टींची देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुमच्या घरात आर्थिक चणचण भासू शकते. 


बाथरुमजवळ लावू नये 


शमीचं रोप लावताना कधीही ते घराच्या बाथरुमशेजारी लावू नये. जेव्हाही तुम्ही शनीचं रोप लावाल तेव्हा ते बाथरुमपासून कमीत कमी 5-7 फीट दूर लावावं. या व्यतिरिक्त शनीचं रोप किचनमध्ये देखील लावू नये. 


तुळशीच्या रोपाशेजारी शमी लावू नये 


भगवान शंकराला शमीचं रोप फार प्रिय आहे.भगवान शंकराच्या पूजेत तुळस वर्जित आहे. त्यामुळे कधीही शमीच्या रोपाला तुळशीच्या रोपाशेजारी लावू नये. यामुळे भगवान शंकराचा क्रोध होतो.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या