Shadashtak Yog 2025 : ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, कुंडलीत ग्रहांची स्थिती अनेक राशींसाठी चांगली असते. मात्र, अनेकदा ग्रहांची स्थिती वाईटही असू शकते. ग्रहांचा सर्व राशींवर वेगवेगळा परिणाम होतो. मंगळ (Mars) ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगल ग्रह ठराविक वेळी संक्रमण करतात. तर, शनी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासासाठी अडीच वर्षांचा कालवधी लागतो. तर, 12 राशींचं चक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. 


ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह 7 डिसेंबर रोजी कर्क राशीत वक्री होणार आहे. तर, 21 जानेवारी 2025 पर्यंत तो याच राशीत असणार आहे. या दरम्यान मंगळ आणि शनी ग्रह एकमेकांच्या सहाव्या आणि आठव्या स्थानी असणार आहे. या दरम्यान षडाष्टक योग निर्माण होणार आहे. 


दरम्यान, 2025 जानेवारीचा काळ काही राशींच्या लोकांसाठी फार कष्टदायक ठरु शकतो. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह 7 डिसेंबर रोजी कर्क राशीत वक्री झाला आहे. तर, 21 जानेवारी 2025 पर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. या दरम्यान मंगळ आणि शनी ग्रह एकमेकांच्या सहाव्या आणि आठव्या चरणात असणार आहे.  


षडाष्टक योग असतो अशुभ 


ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, षडाष्टक योगामुळे कर्क, कुंभ आणि धनु राशीच्या लोकांची नवीन वर्षाची सुरुवात फार चांगली नसणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. षडाष्टक योगामुळे या राशींच्या लोकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुमच्या करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच, आर्थिक संकट वाढण्याबरोबरच तुम्हाला अनेक आजारांचा देखील सामना करावा लागेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                           


Shani Gochar 2025 : नव्या वर्षात 'या' एका राशीला शनी प्रचंड त्रास देणार; साडेसातीचा असणार तिप्पट प्रभाव